घरमहाराष्ट्रपंकजाच काय राज्यातील अनेक नेते सेनेच्या संपर्कात; संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

पंकजाच काय राज्यातील अनेक नेते सेनेच्या संपर्कात; संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

Subscribe

आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर आता पंतप्रधानांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारने भारतीय जनता पार्टीला धक्का देण्यास सुरूवात केली आहे. आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर आता पंतप्रधानांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवतांना याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निर्णय घेतील, असे भाष्य राऊत यांनी केले. तसेच राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून यावेळी ते म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. या पाच वर्षात राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. केवळ प्रसिध्दीसाठी इतका खर्च केला गेल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार स्थापन झाले आहे सरकार यावर बोलेल. बुलेट ट्रेनबाबत सरकार स्थापन होण्याआधीपासून भूमिका मांडत होतो. या बुलेट ट्रेनचे ओझे आमच्या माथी नको ही आमची भूमिका आहेच. हीच भूमिका शरद पवार यांनीही मांडले असल्याचे ते म्हणाले. अजित पवारांच्या बंडाबाबत बोलतांना ते म्हणाले, अजित पवार हा अध्याय संपलेला आहे. विधानसभेत १७० चा आकडा गाठण्यासाठी पवार मेहनत करत होते हे राज्याने पाहीले. सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेईल. धोरणात्मक निर्णयावर नागपुरच्या अधिवेशनात निर्णय घेईल.

- Advertisement -

खातेवाटप मुख्यमंत्री करतील

तीन पक्षांमध्ये सूत्र ठरले आहे. सरकार उत्तम चालले आहे. विस्तार कधी करायचा हा अधिकार मुख्यमत्रयांचा आहे . इतर पक्ष काय बोलतात याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. कोणाला कोणते खाते द्यायचे हा निर्णय मुख्यमंत्रयांचा आहे त्यानुसार ते लवरकच निर्णय घेतील.

पंकजा मुंडेंबाबत १२ तारेखेला कळेल

पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबाबत बोलतांना ते म्हणाले, पंकजा मुंडेच काय अनेक लोक सेनेच्या वाटेवर आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत १२ डिसेंबरलाच कळेल. भाजपमध्ये असंतोष आहे का याबाबत मी बोलणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

भाजप खासदाराच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे देवेंद्र फडणवीसांकडून खंडन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -