घरमहाराष्ट्रयुतीचं तळ्यात-मळ्यात, मग पिंपरीत उमेदवारी कुणाच्या गळ्यात?

युतीचं तळ्यात-मळ्यात, मग पिंपरीत उमेदवारी कुणाच्या गळ्यात?

Subscribe

शिवसेना-भाजपचे राज्यातील नेते युतीच्या जागावाटपावर फक्त 'आमचं ठरलंय' एवढंच सांगत असल्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आता चलबिचल होऊ लागली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक तयार होऊ लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आगामी विधानसभेची जय्यत तयारी सर्व पक्षांकडून केली जात आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत. २००९ साली मतदार संघ पुनर्रचना झाली. शहरात तीन मतदार संघ स्थापन झाले. यात पिंपरी, चिंचवड आणि भोसरीचा समावेश आहे. पिंपरी आणि चिंचवड हा मतदार संघ मावळ लोकसभेत समाविष्ट करण्यात आला तर भोसरी हा शिरूर लोकसभेत समाविष्ट करण्यात आला आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेमुळे गणितं बदलली

२००९ साली मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर भोसरीमधून पहिल्यांदा राष्ट्रवादीचे विलास लांडे, पिंपरीमधून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे तर चिंचवडमधून अपक्ष लक्ष्मण जगताप हे पहिल्यांदा आमदार झाले होते. पिंपरी हा राखीव मतदारसंघ होता. त्यानंतर २०१४ ला दुसरी विधानसभा निवडणूक झाली. यात राष्ट्रवादीचे विलास लांडे पराभूत झाले तर महेश लांडगे विजयी झाले. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे पराभूत झाले. तिथे शिवसेनेचा झेंडा फडकवत आमदार गौतम चाबुकस्वार विजयी झाले. चिंचवडमधून भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे निवडून आले त्यावेळी सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. युती किंवा आघाडी झाली नव्हती.

- Advertisement -

२०१९ला युतीवर सर्व चित्र अवलंबून

शिवसेना-भाजपमध्ये २०१९ विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही? हे अद्याप जरी स्पष्ट नसले, तरी आघाडी मात्र ठरलेली आहे. याच युतीच्या निर्णयावर बरचसं चित्र अवलंबून असणार आहे. त्यावरच लढतीचं स्वरूप ठरणार आहे. युती झाल्यास शिवसेना आणि भाजपाचा पिंपरी-चिंचवड-भोसरी या तिनही मतदार संघांवर प्रचंड प्रभाव आहे. २०१९ च्या लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान झालेले आहे. पिंपरी आणि चिंचवडमध्ये युतीचे श्रीरंग बारणे यांना अधिक मताधिक्य मिळालेले होते. तर भोसरीमधून शिवसेनेचे पराभूत आढळराव पाटील यांना ४१ हजार लीड होता. विधानसभेला सर्वच पक्ष स्वतंत्र लढले तर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण युती झाली तर मात्र युती विरुद्ध महाआघाडी अशी थेट लढत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी सर्वच पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच पक्षातून अनेक नावं इच्छुक असल्याचं समजतंय.

भोसरी विधानसभा मतदारसंघ

भारतीय जनता पार्टी (इच्छुक)

- Advertisement -

१) महेश लांडगे
२) एकनाथ पवार
३) रवी लांडगे

शिवसेना (इच्छुक)

१) सुलभ उबाळे
२) धनंजय आल्हाट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इच्छुक)

१) विलास लांडे
२) दत्ता साने


हेही वाचा – भोसरी विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २०७

पिंपरी विधानसभा मतदारसंघ

भारतीय जनता पार्टी (इच्छुक)

१) अण्णा पिल्ले
२) वेणू साबळे
३) भीमा बोबडे
४) अमित गोरखे
५) तेजस्विनी कदम

आर.पी.आय (आठवले गट)

१) चंद्रकांता सोनकांबळे

शिवसेना (इच्छुक)

१) गौतम चाबुकस्वार
२) जितेंद्र ननावरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इच्छुक)

१) अण्णा बनसोडे
२) राजू बनसोडे
३) सुलक्षणा धर
४) शेखर ओव्हाळ


हेही वाचा – पिंपरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २०६

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

भारतीय जनता पार्टी

आमदार लक्ष्मण जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इच्छुक)

१) भाऊसाहेब भोईर
२) नाना काटे
३) प्रशांत शितोळे
४) मयूर कलाट
५) मोरेश्वर भोंडवे

शिवसेना (युती न झाल्यास)

१) राहुल कलाटे
२) गजानन चिंचवडे


हेही वाचा – चिंचवड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २०५
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -