घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र कर्नाटक सीमेवर 'मराठी'ला संजीवनी, अर्थसंकल्पात भरीव तरतुद

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर ‘मराठी’ला संजीवनी, अर्थसंकल्पात भरीव तरतुद

Subscribe

मराठी शाळा, मराठी वृत्तपत्रे टिकावी म्हणून आजच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद केल्याची घोषणा करण्यात आली

कर्नाटक सीमा भागात मराठी शाळा चालवणारे अतिशय कष्ट आणि मेहनतीने शाळा चालवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या शाळा चालवणाऱ्यांसाठी मदतीचा हात म्हणून राज्य सरकारने १० कोटी रूपयांची मदत ही कर्नाटक सीमा भागात मराठी शाळा चालवणाऱ्या संस्थांसाठी आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने केली. तसेच सीमा भागात मराठी वृत्तपत्रे चालवणाऱ्यांनाही मदतीचा हात राज्य सरकारने देणार असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात वृत्तपत्रे चालवणाऱ्यांना राज्य सरकार आगामी काळात जाहिराती देईल. त्यामुळे या भागात मराठी वृत्तपत्रे चालवणाऱ्या दैनिकांसाठी मोठे पाठबळ मिळणार आहे. मराठी शाळांच्या बाबतीतही अनेक अडचणींचा सामना या संस्था चालकांना करावा लागत होता. पण राज्य सरकारच्या या पुढाकारामुळे सीमांत भागात मराठीची होणारी गळचेपी कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. तसेच या पुढाकारामुळे मराठीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी राज्य सरकारकडून एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे असे अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे दिसते.

- Advertisement -

 

मुंबईत मराठी भवन बांधणार

मराठी भाषेच्या प्रसारासाठी मुंबईत मराठी भवन बांधणार ही घोषणाही आज अर्थसंकल्पात करण्यात आली. याआधीही मराठी भाषा भवन बांधण्यासाठी अनेक जागांचा शोध झाला होता. पण मुंबईतील जागेतील चणचणीमुळे हे मराठी भाषा भवन प्रत्यक्षात उतरले नाही. मुंबईतील मराठी भाषा भवनाच्या बळकटीकरणासाठी आजच्या अर्थसंकल्पातून ५ कोटींची तरतुद केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच एशियाटिक सोसायटीसाठीही आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -