घरमहाराष्ट्रMarathwada Heavy rain : पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा...

Marathwada Heavy rain : पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा रद्द

Subscribe

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना सक्तीने विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे.

मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुराचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात गेले. हाताशी आलेलं पीकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते सोमवारी बीड जिल्ह्यातील नुकसाग्रस्त भागाची पाहणी करणार होते. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे काही दिवस विश्रांती घेणार आहेत. यामुळे विरोधी पक्षनेत्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आणि तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे जवळ जवळ १०० टक्के नुकसान झालं असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारकडे हा शेतकरी आस लावून बसला आहे आणि सरकार काहीच मदत करायला तयार नाही. पीकविमा, अनुदान अशी कोणतीच मदत नाही आतापर्यंत शेतकऱ्यांना करण्यात आली नाही. आमच्या काळात एकेका जिल्ह्याला कोट्यावधींची मदत करण्यात आली होती असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केलं आहे. काळजी करु नका, सारे मिळून सोबत लढू आणि आपल्या बळीराजाला मदत मिळवून देऊ असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. परंतु पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी विश्रांती घेण्याचे ठरवलं आहे. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बीड दौरा रद्द केला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा ४ ऑक्टोबरला करणार आहेत. उस्मानाबाद, कळंबमधील करजखेडा, दाऊतपूर, तेर, आवाड शिरपुरा आणि वाकडी, सौंदना अंबा या गावातील नुकसानीची पाहणी फडणवीस करणार आहेत.

- Advertisement -

पंकजा मुंडे आजारी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना सक्तीने विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. पंकजा मुंडे यांना घशातील टॉन्सिल्सचा त्रास होत असल्यामुळे आगामी ४ दिवस आराम करण्यास सांगितले आहे. यामुळे पंकजा मुंडेंनी विश्रांती घेतली आहे. आपली तब्येत बिघडली असल्याचे पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन सांगितले आहे.


हेही वाचा : उद्या शाळांची घंटा वाजणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यार्थी, शिक्षकांशी साधणार संवाद


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -