घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरMarathwada Water Shortage: भीषण पाणीटंचाई! मराठवाड्यातील 647 गावांना टँकरनं पाणीपुरवठा

Marathwada Water Shortage: भीषण पाणीटंचाई! मराठवाड्यातील 647 गावांना टँकरनं पाणीपुरवठा

Subscribe

मराठवाडयात पाणी टंचाईची झळ तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्यातच परिस्थिती इतकी भीषण आहे की, 647 गावांना ट‌ँकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा तीव्र झाला आहे. उन्हाची झळ नागरिकांना जाणवत आहेच सोबतच पाण्याचीही प्रचंड टंचाई आहे. राज्यातील अनेक भागांत पाण्याचं संकट भीषण झालं आहे. तर मराठवाडयात पाणी टंचाईची झळ तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्यातच परिस्थिती इतकी भीषण आहे की, 647 गावांना ट‌ँकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे. (Marathwada Water Shortage Severe water shortage Water supply by tanker to 647 villages in Marathwada )

मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 22 टक्के जिवंत पाणीसाठा उरला आहे. 75 मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांमधील पाणीसाठा आटला आहे. 750 लघु प्रकल्पांपैकी 108 प्रकल्प कोरेड पडले आहेत. तर 647 गावांना 773 टँकर्सने पाणी पुरवठा सुरू आहे.

- Advertisement -

पाणीसाठ्याची सद्यस्थिती

जायकवाडी- 22 टक्के
पैनगंगा-51 टक्के
येलदरी-40 टक्के
मनात -32 टक्के
विष्णुपुरी-40 टक्के
दुधाना-8 टक्के
मांजरा-8 टक्के
सिद्धेश्वर- 11 टक्के

टँकरने पाणीपुरवठा

मराठवाड्यातील तब्बल 470 गवे आणि 115 वाड्यातील ग्रामस्थ आता टँकरच्या पाण्यावर तहान भागवू लागल्याचं चित्र आहे. सध्या या गावांमध्ये 773 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पुढील काळात हा पाणी प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. टँकरसाठी 361 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून, एकूण 748 विहिरीद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. जलजीवन मिशनद्वारे मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणई प्रश्न कायमचा सोडवण्याचा प्रयत्न आहे. सध्यास्थितीमध्ये आठ जिल्ह्यांत मिळून एकूण 5 हजार 523 पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र त्यातील प्रत्यक्षात केवळ 1 हजार 298 योजनाच पूर्ण झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -