घरमहाराष्ट्रअस्थमावरील औषध कोरोना व्हायरसवर ठरतंय गुणकारी!

अस्थमावरील औषध कोरोना व्हायरसवर ठरतंय गुणकारी!

Subscribe

अस्थमा रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत स्वस्त औषध 'मोंन्टेलुकास्ट' हे कोरोना रुग्णांचा जीव वाचवू शकतो

जीवघेण्या कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासह त्याला आळा घालण्यासाठी जगभरात कोरोनावरील औषधाचा शोध सुरु सातत्याने सुरू आहे, मात्र जेव्हापासून कोरोना जगभरात आला तेव्हापासून अद्याप या कोरोना वरील औषध किंवा लस तयार करण्यात कोणालाही यश मिळालेलं नाही.

दरम्यान, महाराष्ट्रातील यवतमाळच्या एका डॉक्टराने असा दावा केला की, अस्थमावरील एक औषध कोरोना व्हायरसवर गुणकारी ठरतंय. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या यवतमाळच्या डॉक्टरचे नाव प्रशांत चक्करवार असून यांनी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णाला ‘मोंन्टेलुकास्ट’ हे औषध दिल्याने त्याचे प्राण वाचवले जावू शकते, असे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

या डॉक्टराने केलेल्या दाव्यानुसार, अस्थमा रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत स्वस्त औषध ‘मोंन्टेलुकास्ट’ हे कोरोना रुग्णांचा जीव वाचवू शकतो, असा अभ्यासाअंती निष्कर्ष काढला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संशोधनाबाबत भारत सरकारने आणि ICMR ने यात पुढाकार घ्यावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना डॉ. चक्करवार यांनी पत्रव्यवहार केला असून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने यावर काम करण्याची गरज असल्याचे या डॉक्टराचे म्हणणे आहे.

- Advertisement -

तसेच ICMR चे डॉ. रमण गंगाखेकर यांना देखील डॉ प्रशांत चक्करवार यांनी संपर्क साधला असता, तेथील एका रिसर्च समितीचे डॉ. जेरील चेरियन यांनी डॉ प्रशांत चक्करवार यांना पत्र लिहून यावर रिसर्च रिपोर्टचा डेटा आम्हाला द्या, असे कळवले आहे. परंतु एवढी यंत्रणा उभी करणे यवतमाळसारख्या ठिकाणी अशक्य आहे. त्यामुळे सरकारने यात क्लिनिकल प्रॅक्टिस करून हे मोंन्टेलुकास्ट औषध कोरोना रुग्णांसाठी वापरले तर यातून नक्की फायदा होणार असल्याचे यावेळी डॉ प्रशांत चक्करवार यांनी सांगितले आहे.


पावसाळ्यात कोरोनाचा प्रभाव वाढणार, IIT मुंबईच्या प्राध्यापकांचा अभ्यास

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -