घरठाणेबदलापुरात निष्ठावंतांचं भगवं वादळ, शिवसेनेच्या मेळाव्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

बदलापुरात निष्ठावंतांचं भगवं वादळ, शिवसेनेच्या मेळाव्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

Subscribe

बदलापूरमध्ये रविवारी निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला.या मेळाव्याला बदलापूर शहरातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यातील गर्दी पाहून शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. बदलापूर पूर्वेच्या संजीवनी हॉलमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर, शिवसेना उपनेते अल्ताफ शेख यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

बदलापूर शहरातील शिवसेनेच्या नगरसेवकांसह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर बदलापूर शहरात शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर बदलापूर शहरात सुद्धा शिवसेनेचे शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक असे दोन गट तयार झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच बदलापूर शहरात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ह्या मेळाव्याला शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी आणि माजी नगरसेवकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे बदलापूर शहरात शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आल्याची चर्चा असतानाच शहरात पुन्हा एकदा शिवसेनेच्या बांधणीला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

येत्या आठ दिवसात शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे यावेळी संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी सांगितले. तसेच म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. आपण एखाद्या कंपनीत चांगलं काम केलं की मालक आपल्याला कामाप्रमाणे पगार देतो, त्यापेक्षाही चांगलं काम केलं तर सुपरवायझर, मॅनेजर अशी वेगवेगळी पदं मालक कामगाराला देतो. मात्र मॅनेजर बनवलं म्हणून त्याने कंपनीवरच दावा ठोकावा असे म्हणत रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. या सोबतच मी शिक्षण घेत असताना पार्ट टाइम रिक्षा चालवायचो पण सगळेच रिक्षावाले बेइमान नसतात असेही यावेळी रुपेश म्हात्रे यांनी म्हटले.

या मेळाव्याला आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या अनिता बिर्जे, कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार, युवा सेना जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, तसेच बदलापूर शहरातील माजी नगरसेवक प्रकाश पाटील, प्रिया गवळी, शशिकांत पातकर, युवासेना तालुका अधिकारी कृष्णा धुमाळ, शाखाप्रमुख शहबाज खान, विभागप्रमुख किशोर पाटील यांच्यासह शहरातील ज्येष्ठ आणि युवा निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : सुप्रीम कोर्टाच्या हातून धनुष्यबाण सुटणार कधी? उद्याची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -