घरक्रीडाभारतीय संघाचा झिम्बाब्वेवर व्हाइटवॉश, एकदिवसीय मालिकेत शुबमन गिल ठरला हीरो

भारतीय संघाचा झिम्बाब्वेवर व्हाइटवॉश, एकदिवसीय मालिकेत शुबमन गिल ठरला हीरो

Subscribe

भारतीय संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेचा 3-0 असा पराभव केला आहे. आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरी आणि शेवटची मालिका खेळवण्यात आली. यामध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवत 13 धावांनी सामना जिंकला. झिम्बाब्वेचा संघ 49.3 षटकांत 276 धावांवर गारद झाला.

भारतीय संघाने सहाव्यांदा झिम्बाब्वेला एकदिवसीय मालिकेत हरवले आहे. भारताने 1997 पासून झिम्बाब्वेविरुद्धची द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. यादरम्यान त्याने सलग सात मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. भारतासाठी तिसऱ्या सामन्यात शुबमन गिल हीरो ठरला आहे.

- Advertisement -

शुबमन गिलने शतकी खेळी करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. त्याने 130 धावा केल्या आणि सिकंदर रझाचा निर्णायक झेल घेतला. रझाने 95 चेंडूत 115 धावा केल्या. या सामन्यात शुबमन गिलने 97 चेंडूत 130 धावा केल्या. त्याने 15 चौकार आणि 1 षट्कार लगावला. गिल 50 व्या षटकात बाद झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. शिखर धवनच्या 40 आणि कर्णधार केएल राहुलच्या 30 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या विकेटसाठी 63 धावा केल्या. मात्र, केएल राहुलपाठोपाठ धवनही लवकर बाद झाला आणि 21 षटकांत 84 धावांत 2 गडी गमावून टीम इंडियाचा खरा संघर्ष सुरू झाला.

- Advertisement -

शुभमन गिल आणि इशान किशन यांनीही शतकी भागीदारी केली. दोघांनी 140 धावांची भागीदारी केली आणि भारताची धावसंख्या 224 पर्यंत नेली. 43व्या षटकात 50 धावा काढून इशान किशन बाद झाला. शेवटी संजू सॅमसनने दोन षटकार मारून भारताची धावसंख्या 289 पर्यंत नेली. त्यानंतर 290 धावांचं आव्हान झिम्बाव्वेसमोर दिलं.

झिम्बाब्वेची खराब सुरुवात

290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला चांगली कामगिरी करता आली नाही. इनोसंट कायाने 7 धावांवर संघाचा डाव सोडला. 6 धावांच्या स्कोअरवर दीपक चहरने त्याला एलबीडब्ल्यू केले. यानंतर शॉन विल्यम्सने डावाची धुरा सांभाळली. परंतु 82 धावांवर शॉन विल्यम्स बाद झाला. त्यानंतर कर्णधार चकभाव 16 धावा करून बाद झाला.


हेही वाचा : दे घुमाके! शुबमन गिलच्या शतकी खेळीने मास्टर ब्लास्टरचा मोडला विक्रम


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -