Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जेव्हा-जेव्हा विनायक मेटे भेटले तेव्हा-तेव्हा त्यांची तळमळ जाणवली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जेव्हा-जेव्हा विनायक मेटे भेटले तेव्हा-तेव्हा त्यांची तळमळ जाणवली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक आंदोलने त्यांनी मराठा आरक्षणासाठी आणि आरक्षणाला न्याय देण्यासाठी केली.

‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक आंदोलने त्यांनी मराठा आरक्षणासाठी आणि आरक्षणाला न्याय देण्यासाठी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अध्यक्ष होते. सातत्याने त्यांची होणारी तळमळ जेव्हा-जेव्हा ते भेटले तेव्हा-तेव्हा जाणवली’, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी एमजीएम रुग्णालयात दिली. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल झाले होते. (cm eknath shinde talk on vinayak mete dead in navi mumbai)

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांंशी बातचीत करताना एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती दिली. तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलनं त्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “अतिशय दु:खद आणि दुर्देवी बातमी आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक आंदोलने त्यांनी मराठा आरक्षणासाठी आणि आरक्षणाला न्याय देण्यासाठी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अध्यक्ष होते. सातत्याने त्यांची होणारी तळमळ जेव्हा-जेव्हा ते भेटले तेव्हा-तेव्हा जाणवली. काही दिवसांपूर्वीच त्यांची आणि माझी भेट झाली होती. तुम्ही पुन्हा सत्तेत आल्याने आता मराठा समाजाला न्याय मिळेल, असे ते मला म्हणाले. आमच्याबाबतचा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. आज मराठा आरक्षणाबाबत एक महत्वाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला विनायक मेटे येत होते”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -

विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याने त्यांना न मिळालेल्या मदतीच्या आरोपाबाबत प्रश्न विचारला असता, “या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल. तसेच शासन त्यांच्या सोबत आहे. ही घटना आमच्यासाठी खूपच गंभीर आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

नेमका अपघात कसा झाला?

- Advertisement -

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. महामार्गावरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. रविवारी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडकडून मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. एका ट्रकने कट मारल्याने विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर जवळपास एक तास मदत मिळाली नाही. तसेच, 100 नंबरला फोन केला मात्र त्यांनीही फोन उचलला नाही. अथक प्रयत्नानंतर एका गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली, अशी माहिती मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.


हेही वाचा – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे कारच्या भीषण अपघातात निधन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -