Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Maharashtra CET Exam 2021 : राज्यात १५ सप्टेंबरपासून सुरु होणार MHT-CET परीक्षा...

Maharashtra CET Exam 2021 : राज्यात १५ सप्टेंबरपासून सुरु होणार MHT-CET परीक्षा – उदय सामंत

Related Story

- Advertisement -

राज्यातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठीची साईटी परीक्षा येत्या १५ सप्टेंबरपासून आयोजित केली आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या परीक्षा १५ सप्टेंबर २०२१ ते ते १० ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेतल्या जातील. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत सीईटी परीक्षांसंदर्भातील आणि महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील माहिती दिली.

यंदा ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोना निर्बंधांमध्ये निम्म्या म्हणजे २५ हजार संगणकांवर परीक्षा घेणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही सीईटीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर राज्यातील सर्व महाविद्यालय सुरु करण्याचा मानस आहे. त्यापद्धतीने वाटचाल सुरु आहे. असे उदय सामंत यांनी जाहीर केले.

- Advertisement -

या सीईटी परीक्षांमध्ये मास्टर इन कंम्प्युटर ॲप्लिकेशन २५२०८ , मास्टर इन बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन १३२१९० हॉटेल मॅनेजमेंटचे १४६०, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे ५० विद्यार्थी, मास्टर ऑफ आर्किटेक्चरचे १०९५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल

१) यात मास्टर इन कंम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ आर्किटेक्चर , मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटसाठीची सीईटी परीक्षा १५ सप्टेंबरला होईल.

- Advertisement -

२) मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन १५, १६, १७ सप्टेंबर, बॅचर ऑफ आर्ट्स १५ सप्टेंबर, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठीची सीईटी परीक्षा १६, १७, १८ सप्टेंबर २०२१ रोजी होईल.

३) टेक्नोलॉजिच्या परीक्षा म्हणजे इंजिनियरिंग, फार्मसी, ॲग्रीकल्चरसाठीची सीईटी परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत होतील.

४) बॅचरल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचर ऑफ एज्युकेशन, बॅचर ऑफ लॉ ( पाच वर्षासाठी), बॅचर ऑफ फिजिकल एज्युकेशनसाठीची सीईटी परीक्षा ३ ऑक्टोबरला होईल.

५) बॅचर ऑफ लॉ ( ३ वर्षासाठी) ४ आणि ५ ऑक्टोबर, बॅचर ऑफ एज्युकेशन (जनरल) साठीची सीईटी परीक्षा ६ आणि ७ ऑक्टोबरला होईल. तसेच बॅचर ऑफ फाईन आर्टची परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबरला होईल.

या सर्व परीक्षा झाल्यानंतर २० ऑक्टोबरपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर होईल. अशा पद्धतीची यंत्रणा सीईटी विभागाने सुरु केली आहे.

 परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्य़ांसाठी मोठा निर्णय

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. परदेशात जाणाऱ्या पीजीच्या १० विद्यार्थ्यांना आणि १० पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ८ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी आणि शिष्यवृत्तीची संधी मिळणार आहे. पूर्वी या विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्न २० लाख रुपये इतके असणे आवश्यक होते.


 

- Advertisement -