घरमहाराष्ट्रआमदार प्रणिती शिंदेने मोदी यांना म्हटले डेंग्यूचा डास

आमदार प्रणिती शिंदेने मोदी यांना म्हटले डेंग्यूचा डास

Subscribe

कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. आपल्या देशात मोदीबाब नावाचा डेंग्यूचा मोठा डास आल्याचे तिने म्हटले आहे.

कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. आपल्या देशात मोदीबाब नावाचा डेंग्यूचा मोठा डास आल्याचे तिने म्हटले आहे. सोलापूरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रणितीने हे वक्तव्य केले. आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला असून त्याच नाव मोदीबाब असल्याचे तिने यावेळी म्हटले. या डासावर फवारणी करुन या पुढच्या वर्षी हकलून द्यायचे आहे, असे आवाहन तिने यावेळी केले. या डासामुळे सगळ्यांना आजार होत असल्याचेही प्रणितीने यावेळी म्हटले आहे.

काय म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे

‘मोदींना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. १५ लाख जमा करुन देतो असं म्हणाले होते, कुठे गेले ते पैसे. नोटाबंदीमुळे सर्वसामन्यांना फटका बसला आहे. मोदींना ना बहिण ना बायको ना ना मुलगी. त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाची जाणीव होणार नाही. आई आहे पण नोटाबंदीवेळी तिला रांगेत उभं केलं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नाही,’ असे गंभीर आरोप तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -