घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन असं व्यक्तिमत्व, रवी राणांचं समर्थन

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन असं व्यक्तिमत्व, रवी राणांचं समर्थन

Subscribe

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थान-गुजरात समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपालांनी केलं आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे. परंतु अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यपालांची बाजू मांडत त्यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे विधान केलंय त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. राज्यपालांनी सदर विधान भौगोलिक दृष्टीने केलं असावं. मुंबईत अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यात सर्वांचा हातभार आहे, असं रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते – संभाजीराजे छत्रपती

विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो, अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत असे, असं ट्विट माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची राज्यपालांवर टीका

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं विधान वैयक्तिक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. मराठी लोकांचं मुंबईसाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.


हेही वाचा : राज्यपालांनी वाद होईल असे वक्तव्य करणे टाळावे, छगन भुजबळांचे आवाहन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -