घरताज्या घडामोडीMLC Election 2021: भाजपचे सहलीला गेलेले मतदार थेट नागपुरच्या मतदान केंद्रावर दाखल,...

MLC Election 2021: भाजपचे सहलीला गेलेले मतदार थेट नागपुरच्या मतदान केंद्रावर दाखल, अनेक दिवसांपासून होते गायब

Subscribe

राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी २ जागांवर निवडणूक होत आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाण्यात महाविकास आघाडी- भाजप अशी चुरस सुरु झाली आहे. नागपूरमध्ये भाजपचे सर्व नगरसेवक एकाच वेळी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. भाजपचे नगरसेवक रविंद्र भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे आणखी नगरसेवक फोडले जाऊ नये याची काळजी भाजपने घेतली होती. भाजपकडून सर्वच नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आले होते. हे नगरसेवक मागील १० पेक्षा अधिक दिवसांपासून गायब होते. मतदानाच्या दिवशी अखेर सर्व मतदान एका बसमधून मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.

नागपूरमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार रविंद्र भोयर होते परंतु काँग्रेसनं शेवटच्या वेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. रविंद्र भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु भाजप प्रदेश अध्यक्षांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे. भाजपकडे बहुमत आहे त्यामुळे काँग्रेसला उमेदवार बदलण्याची नामुष्की आली असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

भोयर यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपनं खबरदारी बाळगली आहे. यामुळे निवडणूक होईपर्यंत भाजपकडून मतदारांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आले होते. आज मतदानाच्या दिवशीच हे मतदार एकाच वेळी मतदान करण्यासाठी दाखल झाले आहेत. भाजपकडे ३१४ मतदार आहेत तर काँग्रेसकडे १४४ मतदार आहेत. अपक्ष सदस्यांच्या मतदानावर या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या २ जागांवर निवडणूक

विधानपरिषदेच्या ५ मतदारसंघात ६ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली होती. काँग्रेस- भाजपच्या चर्चेमध्ये दोन जागांवर ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. यातील एक जागा काँग्रेसला आणि एक भाजपला मिळाली आहे. तसेच मुंबईतील २ जागांवर देखील बिनविरोध निवड झाली आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाण्यात प्रत्यक्ष निवडणूक होत आहे. अकोल्यामध्ये शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपकडून वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. अकोल्यात शिवसेना बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान नागपूर आणि अकोल्यातील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरत असून भाजप, शिवसेना आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : MLC Election: राज्यात विधान परिषदेच्या २ जागांसाठी आज मतदान, भाजप-मविआत रस्सीखेच सुरु


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -