घरमहाराष्ट्र'या' महत्त्वाच्या समस्येसाठी राज ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा

‘या’ महत्त्वाच्या समस्येसाठी राज ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा

Subscribe

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील दौऱ्यासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेत असून आता मनसेदेखील राज्यभर आढावा दौरा करणार आहे. पुढील आठवड्यात राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत. या दौऱ्यामधून राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाने विधानसभेची तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. लोकसभा न लढता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात एकही उमेदवार नसतानाही भाजपविरोधात एकहाती सभा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला. राज यांच्या सभेची दखल देशपातळीवर देखील घेतली गेली.

दुष्काळ आणि बेरोजगारी गंभीर समस्या 

राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार नसतानाही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी महाराष्ट्र दिनी दुष्काळ आणि बेरोजगारीवर दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले होते. राज्याला या दोन संकटांवर दुर्लक्ष करून परवडणार नाही. राज्यातील दुष्काळ परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते यावेळचा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा गंभीर आहे. दुष्काळामुळे गावं ओस पडली आहेत. तेथील लोकांचे लोंढे शहरांकडे उपजीविकेच्या शोधात येत आहेत, असेही राज यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -