घरताज्या घडामोडीविधायक अगवा नहीं, भगवा हुए है, मोहित कंबोज यांचं खोचक ट्विट

विधायक अगवा नहीं, भगवा हुए है, मोहित कंबोज यांचं खोचक ट्विट

Subscribe

नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. तसेच ते गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दुसरीकडे मध्यरात्री आमदारांना विमानानं नेताना त्यांच्यासोबत भाजपचे नेते मोहित कंबोज आणि संजय कुटे दिसले होते. मात्र, यावेळी कंबोज यांनी एक खोचक ट्विट केलं आहे.

विधायक अगवा नहीं हुए, भगवा हुए है! जय श्री राम, असं ट्वीट मोहित कंबोज यांनी केलं आहे. यापूर्वीही मोहित कंबोज हे आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता ते आमदारांसह गुवाहाटी येथे देखील पोहोचले असल्याचं समोर येत आहे. मोहित कंबोज, संजय कुटे आणि रविंद्र चव्हाण हे तिघेही सध्या गुवाहाटीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर येताच एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचं नाट्य सुरू झालं आहे. त्यानंतर शिंदे हे समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत येथील हॉटेलमध्ये असल्याचं आढळलं. या सर्व घडामोडीत भाजपाकडून एकनाथ शिंदे आणि आमदारांना रसद पुरवली जात असल्याचंही समोर आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं – संभाजीराजे छत्रपती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -