घरमहाराष्ट्रजाता, जाता शेतकऱ्यांच्या या तीन मागण्या पूर्ण करा, आशीर्वाद मिळेल; राजू शेट्टींचा...

जाता, जाता शेतकऱ्यांच्या या तीन मागण्या पूर्ण करा, आशीर्वाद मिळेल; राजू शेट्टींचा मविआला खोचक टोला

Subscribe

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून शेवटचा अल्टिमेटम देत कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्यातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु झाल्याने असं सुचक ट्विट शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत यांनी केले. यामुळे खरचं मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करता का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून सत्ता वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनाही शिवसेनेकडून शेवटचा अल्टिमेटम देत कारवाईचा इशारा दिला आहे.

याचदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला सत्तांतरणाच्या चर्चांवरून खोचक टोला लगावला आहे. जाता जाता शेतकऱ्यांच्या तीन मागण्या पूर्ण करा, तुम्हाला शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील असं राजू शेट्टींनी म्हटले आहे.

- Advertisement -

राजू शेट्टी यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत म्हटले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनो आता तरी शहाणे व्हा. जाता जाता ऊसाची एक रक्कमी एफ.आर.पी व भूमी अधिग्रहणाचा कायदा पुर्ववत करा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50 हजार खात्यावर जमा करा. शेतकरी तुम्हाला दुवा देईल. ज्याची भविष्यात तुम्हाला फारच गरज आहे. राजू शेट्टी यांनी शेवटची संधी जमतय का बघा !! अशी कॅप्शन देखील या पोस्टवर दिली आहे.

या पोस्टच्या माध्यमातून राजू शेट्टींनी महाविकास आघाडी सरकारला चांगलाच टोला हाणला आहे. दरम्यान इतर पोस्टमधूनही राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागत असतात. यातील सर्वाधिक पोस्टमधून त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली बघून लोकशाहीवर प्रेम करणारा प्रत्येक माणसाच्या मनाला वेदना होत आहेत. अर्थात, राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशी टीका अलीकडेच राजू शेट्टी यांनी केली आहे.

विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीमध्ये राजू शेट्टी यांच्या नावाचा समावेश होता. मात्र पक्षांतर्गत तीव्र विरोधानंतर त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घेतले. यामुळे त्यांनी सध्या एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीवर चांगलेच नाराज आहेत.


‘मी सरकार बरखास्त म्हटल….’ सरकार बरखास्तीवरील ट्विटवर संजय राऊतांच मोठं विधान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -