घरमहाराष्ट्रMoney Laundering Case : अनिल देशमुखांच्या दोन्ही मुलांना PMLA कोर्टाचा समन्स

Money Laundering Case : अनिल देशमुखांच्या दोन्ही मुलांना PMLA कोर्टाचा समन्स

Subscribe

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना पीएमएलए कोर्टाने समन्स जारी केला आहे. या समन्समध्ये त्यांना 5 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने आज हा समन्स जारी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री यांच्यावर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून 100 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे आरोप केले होते. यानंतर तपास यंत्रणांकडून अनिल देशमुखांची चौकशी सुरु आहे. दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपींच्या यादीत अनिल देशमुख हे आरोपी क्रमांक 15 आहेत.

- Advertisement -

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने मुदत वाढवून मागितली. या प्रकरणाची सुनावणी आता 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे ईडी न्यायालयासमोर 9 फेब्रुवारी ला उत्तर दाखल करणार आहे त्याचदिवशी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.


आता तासाभरात बीजिंगवरून गाठणार येणार अमेरिका; चीन बनवतंय हायपरसॉनिक विमान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -