घरमहाराष्ट्रमुंबईत मान्सून ऑन टाईम; अखेर शहरात पावसाचा जोर वाढला

मुंबईत मान्सून ऑन टाईम; अखेर शहरात पावसाचा जोर वाढला

Subscribe

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला अशी घोषणा हवामान विभागाने केली असली तरीही प्रत्यक्षात मुंबईकर मात्र मान्सूनच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर गेल्या २४ तासात पावसाने मुंबईत जोर धरला असल्याचे हवामान विभागाकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई तसेच शहराच्या नजीकच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाल्याचे मुंबई वेधशाळेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये पडलेल्या पावसाने मुंबईतही आता मान्सूनचा जोर वाढला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. मध्यरात्रीनंतर शहरात पावसाने जोर धरला आहे. तसेच काही ठिकाणी सरासरी पावसाची नोंद ही ५० मिमी इतकी झाली आहे. अनेक भागात चांगल्या पावसाची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईसह ठाणे परिसर तसेच मुंबईच्या पश्चिम दिशेलाही पावसाची चांगलीच हजेरी होती. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये पश्चिमेच्या किनारपट्टीच्या दिशेने मान्सून सरकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये मरोळ येथे सर्वाधिक पावसाची ५०.६ मिमी इतकी नोंद झाली. मुंबई शहरासोबत मिरा भाईंदर, नवी मुंबई, डोंबिवली, ठाणे, पनवेल आदी भागातही चांगला पाऊस झाल्याची आकडेवाडी हवामान विभागाने जाहीर केली आहे. दक्षिण मुंबईचा भाग तसेच ठाणे परिसरात मात्र मोठ्या पावसाची नोंद झाली आङे. गेल्या २४ तासात कुलाबा वेधशाळा येथे २७.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर येत्या २४ तासांमध्ये मुंबईत ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

- Advertisement -

मुंबई मान्सून नॉर्मल

मुंबईत मान्सूनची वेळेत असणारी हजेरी गेल्या काही वर्षांमध्ये हुकली होती. पण यंदा मात्र मान्सून ऑन टाईम असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे. मान्सून यंदा मुंबईत ११ तारखेला दाखल झाला. गेल्या वर्षी मुंबईत हाच मान्सून २५ जूनला दाखल झाला होता. गेल्या ४५ वर्षात मुंबईत मान्सून सर्वात उशिरा दाखल होण्याचा हा एक नवा ट्रेंड होता. तर २०१८ साली मान्सून ९ जूनला तर २०१७ साली १२ जूनला मान्सूनने मुंबईत हजेरी लावली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona: सरकारनं मुंबईतील ९५० मृत्यू दडवले? देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -