घरताज्या घडामोडीBreaking: ३ ऑगस्ट रोजी होणारे पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकलले

Breaking: ३ ऑगस्ट रोजी होणारे पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकलले

Subscribe

दरवर्षी जून-जुलै महिन्यात होणारे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्ट रोजी होणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आता ७ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली.

जून महिन्यात २२ तारखेला पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अधिवेशन ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. मात्र राज्यातील कोरोना वाढीचा आकडा अजूनही ओसरलेला नाही. त्यातच अनेक आमदार आणि मंत्र्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यातून सर्वचजण सुखरुप बाहेरही पडले. मात्र अधिवेशन घ्यायचे झाल्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार, त्यांचे चालक, पीए असा लवाजमा मुंबईत येणार. अनेक राजकीय कार्यकर्तेही अधिवेशनादरम्यान आपापली कामे घेऊन मुंबईत येत असतात. अशावेळी मुंबईत आल्यानंतर या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास ते आपापल्या जिल्ह्यात संसर्ग वाढवू शकतात, ही भीती आहे.

- Advertisement -

तसेच जूनमध्ये झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांसाठी आवश्यकता भासल्यास ३ ऑगस्टपूर्वी एक दिवसाचे विशेष अधिवेशन भरवू,असे सांगितले होते. मात्र अद्याप विशेष अधिवेशन भरविण्याबाबतही निर्णय झालेला नाही. पहिल्यांदा अधिवेशन पुढे ढकल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी झाल्याचा ठपका विरोधकांनी लावला होता. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याच्या आताच्या निर्णयाकडे विरोधक कसे पाहतात? हे पाहावे लागेल.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -