Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुलुंडमध्ये मोती छाया इमारतीचा स्लॅब कोसळला, 2 जणांचा मृत्यू

मुलुंडमध्ये मोती छाया इमारतीचा स्लॅब कोसळला, 2 जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबई : मुलुंड (पूर्व) येथे सोमवारी सायंकाळी उशिरा एका दुमजली इमारतीमधील सिलिंगचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत देवाशंकर शुक्ला (९३) व त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला (८७) या वृद्ध दाम्पत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुलुंड ( पूर्व), नाने पाडा येथील मोती छाया इमारतीचा स्लॅब कोसळला. एका तळमजला अधिक दुमजली इमारतीमध्ये देवाशंकर शुक्ला (९३) व त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला हे वृद्ध राहत होते. सदर इमारत ही २० – २५ वर्षे जुनी होती. सदर इमारतीचा काही भाग हा धोकादायक स्थितीत असल्याचे समजते. पालिकेने या इमारतीला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ३५१ ची नोटीस बजावली होती. सोमवारी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास सदर इमारतीच्या सिलिंगचा मोठा भाग अचानकपणे कोसळला.

- Advertisement -

या दुर्घटनेत देवाशंकर शुक्ला (९३) व त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला हे दोघेजण गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दाखल झाले होते. देवाशंकर व त्यांची पत्नी अरखीबेन यांना जखमी अवस्थेत तात्काळ नजीकच्या आशिर्वाद क्रिटिकल केअर या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


हेही वाचा : देशभक्ती व्यक्त करणाऱ्या शब्दाला विरोध नाही, सुधीर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण


- Advertisement -

 

- Advertisment -