घरमहाराष्ट्रखासदार अमोल कोल्हेंची अमित ठाकरेंविषयीची 'ती' पोस्ट चर्चेत

खासदार अमोल कोल्हेंची अमित ठाकरेंविषयीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Subscribe

खासदार अमोल कोल्हे हे त्यांच्या अभिनयामधून सर्वांच्या चर्चेचा विषय तर ठरलेलेच असतात. पण ते त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे देखील अनेकदा चर्चेत असतात.

खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) हे त्यांच्या अभिनयामधून सर्वांच्या चर्चेचा विषय तर ठरलेलेच असतात. पण ते त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे देखील अनेकदा चर्चेत असतात. अमोल कोल्हे हे एक असे राजकारणी आणि अभिनेते आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते प्रत्येक गोष्टीची अपडेट त्यांच्या इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्वीटरला शेअर करत असतात. सध्या चर्चा होत असलेला लोकमत समुहाचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची खासदार अमोल कोल्हे आणि मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला अनेकांनी उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांची अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासोबत भेट झाली. त्यांच्या या भेटीचा फोटो अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला पोस्ट केला आहे. तर “जमिनीवर पाय असलेल्या अमित ठाकरेंना भेटून आनंद झाला,” असे कॅप्शन अमोल कोल्हे यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यामुळे त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तर अनेक नेटकऱ्यांना त्यांची ही पोस्ट आवडली असून नेटकऱ्यांना त्यांच्या यो पोस्टखाली कमेंट सुद्धा केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

- Advertisement -

 अमोल कोल्हे सोशल मिडियावर प्रचंड सक्रीय असतात. रविवारी (ता. 23 एप्रिल) जगभरात World Book Day साजरा करण्यात आला. याचेच निमित्त साधून अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ट्वीटरला फोटोसहित पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, “विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण? #WorldBookDay #WorldBookDay2023”.. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये ते ‘नेमकचि बोलणे.. शरद पवार यांचे विचारविश्व’ आणि ‘द् न्यू बीजेपी’ हे पुस्तक वाचताना दिसत आहेत.

- Advertisement -

अभिनय क्षेत्रामध्ये ठसा उमटवल्यानंतर अमोल कोल्हे हे राजकारणात सक्रिय झाले. शिवसेना पक्षातून राजकारणाला सुरुवात केलेले अमोल कोल्हे हे आता राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदराने पाहत असतात.


हेही वाचा – बारसू प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले… 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -