घरताज्या घडामोडीनवनीत राणा यांची प्रकृती खालावली; नागपूरहून मुंबईकडे रवाना

नवनीत राणा यांची प्रकृती खालावली; नागपूरहून मुंबईकडे रवाना

Subscribe

नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याकरता आणण्यात येत आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासहीत त्यांच्या परिवारातील तब्बल १२ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर नवनीत कौर राणा यांच्यावर नागपूर येथील वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याकरता आणण्यात येत आहे. नवनीत राणा यांना मुंबईत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था होण्यास वेळ लागत असल्याने त्यांना बाय रोड आणण्यात येत आहे.

लीलावती रुग्णालयात केले जाणार दाखल

नवनीत राणा यांना ६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांना सुरुवातीला घरीच क्वारंटाइन करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ११ ऑग्सट रोजी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने मुंबईला हलवण्यात येत आहे. त्यांना मुंबईत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला वेळ लागणार असल्याने त्यांना तातडीने बाय रोड मुंबईत आणण्यात येत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती, आमदार रवी राणा आहेत. नवनीत राणा यांना मुंबईत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. रवी राणा यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपाचर सुरू आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवरही वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून मुलांवर घरीच अमरावतीला उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – चाकरमान्यांसाठी खुशखबर; कोकणात जाण्यासाठी टोलमाफ!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -