घरमुंबईपार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वर दाखल; घेणार शरद पवारांची भेट

पार्थ पवार ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; घेणार शरद पवारांची भेट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती. शरद पवार पार्थला इमॅच्युअर म्हणाले होते. मात्र आज, सायंकाळी पार्थ पवार हे शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी पार्थ पवार सिल्व्हर ओकवर गेल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी ते पार्थ पवार हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र ती भेट भूर्वनियोजित असून त्यावेळी पार्थ पवारसंबंधी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी पार्थ पवार यांना थेट सुनावले होते. पार्थ पवार हे इम्याच्युअर असून त्यांच्या मताला कवडीचीही किंमत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

नवनीत राणा यांची प्रकृती खालावली; नागपूरहून मुंबईकडे रवाना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -