घरठाणेआपल्यांनीच केली गद्दारी; खासदार राजन विचारेंनी व्हिडीओ क्लिपद्वारे साधला शिंदे गटावर निशाणा

आपल्यांनीच केली गद्दारी; खासदार राजन विचारेंनी व्हिडीओ क्लिपद्वारे साधला शिंदे गटावर निशाणा

Subscribe

ठाणे : लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी पत्रापाठोपाठ शुक्रवारी स्व आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनीच 2 मिनिट 36 सेकंदाचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ‘आमचा आनंद हरपला’ या शीर्षकाने. त्या व्हिडिओ क्लीपमध्ये दिघे यांच्या कामाचा धडाका त्यांची पक्ष निष्ठा तसेच गद्दारांविरोधातील त्यांच्या रुद्र रूपाचा उल्लेख ऐकताना अंगावर काटा येतो. तसेच आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी असा उल्लेख करून नाव न घेता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने खासदार विचारे यांनी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर अपलोड केली आहे. यामध्ये दिघे यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देताना, ‘तुमचा प्रवास पाहायला गुरुवर्य (आनंद दिघे) आम्ही, याची देही याची डोळा. श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत ही तुम्ही धरली फक्त आणि फक्त सत्याची कास. अखंड शिवसेनेबद्दलची आस. त्याला आघात निष्ठेची साथ. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अस्सल मातीतला माणसांसाठी लढणारा माणूस खरा. तुम्ही गेलात आणि शिवसैनिकांत पाझराला अश्रूंचा झरा आणि आज आमचा आनंदच हरपला’ असा त्या व्हिडीओत उल्लेख केला. याशिवाय ‘बाळासाहेब म्हणजे तुमचे कुलदैवत. अंतिम त्यांचा शब्द. तोच झेलत तुम्ही ठाण्यात भगवा कायम ठेवला. तुम्ही सामान्य शिवसैनिक पेटवला. हिंदुत्वाचा ज्वालामुखी तो तुम्ही जागवला. आमचे सर्वांचे गुरुवर्य तुम्ही. निष्ठेचे दैवत तुम्ही. तुम्ही आम्हापासून दूर गेलात आणि तुटला आम्हाला एकसंघ ठेवणारा दोरा. आमचा आज आनंदच हरपला. गद्दारांना क्षमा नाही म्हणून तुम्ही गरजला. रुद्र अवतार पाहून तुमचा अख्खा महाराष्ट्र हादरला. कसलीच चूक नसताना टाडामध्ये तुरुंगात असताना मागितली असती माफी तर तुम्ही सुटलाही असता. पण निष्ठेच्या दरवाजाजवळ कुठलीच माघार नसते. कुठलेच व्यवहार आणि लोभ नसतात. असते ती केवळ निष्ठा, आत्मसन्मान, समाजाचा उत्कर्ष आणि संघटना. पण जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरा. ज्यांना घडवले तुम्ही त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला’. अशा शब्दात बोचरी टिका शिंदे गटावर खासदार विचारे यांनी केली आहे. या अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अंगावर अक्षरशः काटा येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -