घरताज्या घडामोडीशिंदे-फडणवीस या महिलांवर गोळ्या चालवणार का?, संजय राऊतांचा सवाल

शिंदे-फडणवीस या महिलांवर गोळ्या चालवणार का?, संजय राऊतांचा सवाल

Subscribe

राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. या प्रकल्पाला विरोध केल्यानंतर काही महिलांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य करत ट्वीट केलं आहे. हे सरकार दहशतवादी मनोवृत्तीचं असून, बारसूमध्ये हत्याकांड घडवण्याच्या तयारीत आहे, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तर शिंदे-फडणवीस या महिलांवर गोळ्या चालवणार का?, असा सवालही संजय राऊतांनी ट्वीटरच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारला आहे.

संजय राऊतांचं ट्वीट काय?

- Advertisement -

या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक महिलांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. बारसु! शिंदे-फडणवीस या महिलांवर गोळ्या चालवणार का? रिफायनरीसाठी भू-संपादन त्वरित बंद करा. ही दडपशाही महाग पडेल, अशा प्रकारचं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

- Advertisement -

…तर जालियनवाला हत्याकांड होईल 

रिफायनरीच्या आंदोलकांचा विरोध केला जात आहे. हे अतिशय विकृत मनोवृत्तीचं सरकार आहे. दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. बारसूच्या माळरानावर जमलेले हजारो लोक जर मागे हटले नाही तर आम्हाला भीती आहे की, ते या आंदोलकांवर गोळ्या झाडतील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूचं हत्याकांड होईल, अशी आम्हाला भीती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यात लक्ष घालत आहेत. कदाचित या सर्व प्रकरणावर मुंबईला त्यात लक्ष घालावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले होते.

तत्काळ सर्वेक्षण स्थगित करा, अजित पवारांची मागणी

रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.


हेही वाचा : दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका ; तत्काळ सर्वेक्षण स्थगित करा, अजित पवारांची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -