घरमहाराष्ट्रसावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक कटकारस्थान- संजय राऊत

सावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक कटकारस्थान- संजय राऊत

Subscribe

स्वातंत्र्य वीर सावकरांवरून राजकीय पक्षांमध्ये आत्ता चांगलीच जुंपल्याचे पाहयला मिळत आहे. अशात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गांधींजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली असे म्हटले होते, या वक्तव्याला आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ‘गेल्या काही वर्षांपासून सावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक कटकारस्थान सुरु आहे’ अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे. आज नाशिकमध्ये संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, “सावरकरांना गेल्या काही वर्षपासून खलनायक ठरवण्याचा कसोशीने प्रयत्न होतोय.. हे कारस्थान आहे… हे कट आणि कपट आहे… हे कारस्थान सर्वांनी मिळून उधळून लावलं पाहिजे.”

- Advertisement -

यावेळी संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आवाहन केले की, मी आत्ता नाशिकच्या भूमीवर उभा आहे… इथूनच सावरकर निर्माण झाले. इथूनचं अभिनव भारत निर्माण झाला… इथेच बाजूला भगूर आहे त्यांचे जन्मस्थान.. सावकरांवर सतत होणारी चिखलफेक थांबवायची असेल आणि त्यांना महान क्रांतीकारक या लढ्याचे महान सेनानी म्हणून मान्यता आत्ता द्याची असेल तर त्यांना ताबोडतोब भारतरत्न सन्मानाने सन्मानित करा. हे मी त्यांना सावरकरांच्या नाशिकच्या भूमीवरून सांगतोय. असं राऊत म्हणाले.

“सावरकरांनांवर कोण अशी टीका करत असेल…. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे.. गांधीजींवरही टीका होता, टिकळांवरही टीका होते. पण ज्या गल्लिच्छ पद्धतीने काही लोक सावरकरांवरती चिखलफेक करतायत अशा लोकांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. कारण अशाप्रकारे देशाच्या क्रांतीकारकांवर चिखलफेक केलेली चालणार नाही.” अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

“स्वातंत्र लढ्यातील सेनापतींचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुरु झालेलं आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जेवढं स्थान गांधींना आहे, तेवढचं स्थान पटेलांना आहे, सावरकरांना आहे. तेवढचं स्थान भगतसिंगाला आहे. तेवढचं टिळकांना आहे. प्रत्येकाचं योगदान त्याचं तोलामोलाचं आहे.” असंही राऊत म्हणाले.

“स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. सावकरांनी या देशाला क्रांतीची दिशा दाखवली. वीर सावकरांनी अनेक क्रांतीकारक निर्माण केले. ब्रिटिशांच्या मानात दहशत निर्माण केली. ठीक आहे.. अहिंसेचे आंदोलन महात्मा गांधींनी केले.. मदन लाल धिंग्रासारखी लोकं निर्माण केली. असंख्य क्रांतीकारकांचे ते शिरोमणी होते.” असंही राऊत म्हणाले.

“१०० कोटी लसीकरणाची वस्तुस्थिती वेगळी”

“देश आपला आहे.. प्रधानमंत्री आपले आहे. त्यांनी लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे तर सहभागी व्हायला पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, १०० कोटी लसीकरण झालेले नाही, २३ ते २९ कोटी लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे ही पोकळी आपल्याला भरुन काढावी लागेल. असंही खासदार संजय राऊत म्हणाले.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -