घरमुंबईulhasnagar slab collapses : उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, १ जखमी

ulhasnagar slab collapses : उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, १ जखमी

Subscribe

उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्ती मृत्यू झाला आहे, तर १ जण जखमी झाला आहे. उल्हासनगरमधील कुलदेवी मंदिरासमोरील पाच मजली पारस इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला आहे. या पाचव्या मजल्याच्या बेडरुमचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळल्याने राजा उर्फ आकाश पोपटानी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे.

या घटनेनंतर महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे, सहआयुक्त गणेश शिंपी य़ांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आढावा घेतला आणि संपूर्ण इमारत खाली केली आहे. ही इमारती २५ वर्षे जुनी इमारत होती. मात्र महानगरपालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीच या इमारतीचे नाव नव्हते. असे असतानाही अचानक इमारतीच्या स्लॅब कोसळण्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जीव वाचवण्यासाठी इमारतीतील नागरिकांनी पळापळ सुरु केली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅब खाली दबलेल्या राजा उर्फ आकाश पोपटानी यांना बाहेर काढले व तात्काळ उपचारांसाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

उल्हासनगरमध्ये इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटना सतत सुरु असून गेल्य़ा सहा महिन्यात दोन घटनांमध्ये १२ जणांचा मृत्य़ू झाला आहे. त्यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहे. राज्य सरकारकडूनही कमिटी स्थापन करण्यापलीकडे कोणत्याही उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत.


सावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक कटकारस्थान- संजय राऊत


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -