घरताज्या घडामोडीMPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांना दणका, न्यायालयाचा आयोगाच्याबाजूने निर्णय

MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांना दणका, न्यायालयाचा आयोगाच्याबाजूने निर्णय

Subscribe

आयोगाकडून पीएसटी, एसटीआय आणि एएसओच्या पदांसाठी पूर्व परीक्षे घेण्यात आली होती. या परीक्षेच्या उत्तर तालिकेत आयोगाकडून चुकीची उत्तरे दिली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आयोगाने उत्तरतालिकेत चुकीची उत्तरे दिली असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी याचिकेत केला होता. आज या याचिकेवर न्यायालयात सुनावणी करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आयोगाच्या बाजूने निर्णय दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. दरम्यान आता विद्यार्थी हायकोर्टात धाव घेणार असून याचिका दाखल करतील. विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेमुळे आयोगाने ब गटाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. 5 आणि 12 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा आयोगाने रद्द केल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2021 मध्ये पूर्व परीक्षा घेतली होती. या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या दिनांक २५ नोव्हेंबर, 2020 रोजी उत्तरतालिकेसंदर्भात याचिका होती. मॅटने दिलेल्या निर्णयामुळे पीएसआय, एसटीआय आणि एएसओच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या विद्यार्थ्यांनी आता हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे ठरवले आहे. मुलांनी आयोगाविरोधात न्यायालयीन लढाई सुरु केल्यामुळे परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. आयोगाकडून पीएसटी, एसटीआय आणि एएसओच्या पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या उत्तर तालिकेत आयोगाकडून चुकीची उत्तरे दिली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

- Advertisement -

आयोगाकडून परीक्षा रद्द

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तर तालिकेसंदर्भातील दाखल रिट याचिकेवर न्यायाधिकरणाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर विषयांकित परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल. अंतिम न्यायनिर्णय येईपय॑त परीक्षेच्या आयोजनासंदभांतील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. २९ जानेवारी, २०२२, दिनांक ३० जानेवारी, २०२२, दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ व दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित विषयांकित परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा : मोदींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अन्यथा…, नाना पटोलेंचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -