घरताज्या घडामोडीMSC फिजीक्सच्या एका विषयाची १४ जानेवारीला पुनर्परिक्षा

MSC फिजीक्सच्या एका विषयाची १४ जानेवारीला पुनर्परिक्षा

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एमएससी फिजिक्स सत्र ३ मधील स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स या विषयाची पुनर्परिक्षा येत्या १४ जानेवारीला घेण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एमएससी फिजिक्स सत्र ३ मधील स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स या विषयाची परीक्षा १३ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १४ जानेवारी २०२० रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

२६ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत एमएससी फिजिक्सच्या सत्र ३ मधील स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स या विषयासाठी परीक्षेत बसलेल्या नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा १४ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या त्याच परीक्षा केंद्रावर घेतली जाईल.

- Advertisement -

जास्त गुण ग्राहय धरले जातील

ज्या विद्यार्थ्यांनी १३ डिसेंबर रोजी परीक्षा दिलेली असेल तसेच ते विद्यार्थी १४ जानेवारी रोजी परीक्षा देतील. या दोन्ही परीक्षेमधील ज्या परीक्षेत गुण जास्त असतील ते गुण ग्राह्य धरण्यात येतील, असाही निर्णय या बैठकीत करण्यात आला. अशा आशयाचे परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. तसेच विज्ञान विद्याशाखेतील या परीक्षेशी संबंधित महाविद्यालयानाही पाठविण्यात आले आहे.


हेही वाचा – खुशखबर! थर्टीफर्स्टनिमित्ताने रेल्वे प्रशासनाकडून विशेष लोकल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -