घरताज्या घडामोडी'नववर्ष धुंदीत नाही शुद्धीत साजरे करा'

‘नववर्ष धुंदीत नाही शुद्धीत साजरे करा’

Subscribe

समाजामध्ये वाढणाऱ्या व्यसनाच्या सवयीमुळे तरुणांच्या नैराश्यात जाण्याचं प्रमाण वाढत आहे. कोणताही प्राणी दारु पित नाही, तंबाखू खात नाही, चरस, गांजा, ड्रग्ज यांचं सेवन करत नाही. पण मनुष्य प्राणी हा जगात सर्वांत बुध्दीमान असूनही तो र्निबुध्दी असल्यासारखा व्यसनांना जवळ करुन आपले आरोग्य धोक्यात आणत आहे. अशा आशयाचे पथनाट्य महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्यावतीने सादर करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी नशाबंदी मंडळाने त्यांच्याकडून नवीन वर्षाचा संकल्प देखील करुन घेतला आहे.

उद्याच्या पिढीला आरोग्यसंपन्न सदृढ आणि व्यसनमुक्त ठेवून शक्तीशाली राष्ट्र घडवण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नवीन वर्षांची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि नवीन वर्षाचा संकल्प ठेवून करत असतो. पण, ३१ डिसेंबर यादिवशी अनेक युवक स्वतःच्या सुंदर आरोग्यमय जीवनाला काळीमा फासतात. त्यामुळे ३० डिसेंबर पासूनच नशाबंदी करण्याचा संदेश बलून रुपी प्राणी, सेल्फी कॉर्नर, पथनाट्य, प्रबोधन गीतांमधून देण्यात येत आहे.

- Advertisement -

नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा, असं प्रेमाचं आवाहन प्राण्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला करण्यात आले. या कार्यक्रमावेळी बलुनरुपी प्राण्यांचे वेश परिधान करुन आम्ही प्राणी असूनही कोणतेही व्यसन करत नाहीत, तुम्ही तर माणसं आहात असा संदेश देत प्रचार पत्रकांचे वाटप करुन व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. २०२० मध्ये मी व्यसनमुक्त राहीन अशा संकल्पाला उपस्थित लोक उस्फुर्त प्रतिसाद देत होते. एकीकडे चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढत असताना मुंबईकरांचा मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राला नशामुक्तीकडे नेण्याचे पाऊलच आहे असे नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -