घरक्राइमMumbai : पैसे घेतले पण फ्लॅट नाही दिले; निर्मल लाइफस्टाइलच्या 2 बिल्डरना...

Mumbai : पैसे घेतले पण फ्लॅट नाही दिले; निर्मल लाइफस्टाइलच्या 2 बिल्डरना अटक

Subscribe

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने निर्मल लाइफस्टाइलच्या दोन बिल्डरना अटक केली आहे. धर्मेश जैन आणि राजीव जैन अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी या दोन बिल्डरना न्यायालयात हजर केले.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने निर्मल लाइफस्टाइलच्या दोन बिल्डरना अटक केली आहे. धर्मेश जैन आणि राजीव जैन अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी या दोन बिल्डरना न्यायालयात हजर केले. याप्रकरणी न्यायालयाने दोघांनाही ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (mumbai 2 builders of nirmal lifestyle arrested accused of not giving flat after taking money)

निर्मल लाईफस्टाईल यांना मुंबईतील आघाडीचे बिल्डर म्हणून ओळखले जाते. त्यांचे अनेक प्रकल्प मुंबईत सुरू आहेत. त्याच्याविरोधात 34 जणांनी तक्रारी केल्या होत्या, त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या प्रकल्पाबाबत ही तक्रार करण्यात आली होती तो प्रकल्प मुलुंड भागातील आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी फ्लॅट बुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैसे जमा करूनही त्यांना बिल्डरने फ्लॅट दिला नाही. तपासानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अलीकडच्या काळात त्यांचे काही प्रकल्प रखडले असून त्यामुळे त्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना सदनिका वेळेवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

महारेराकडून कारणे दाखवा नोटिस

- Advertisement -

दरम्यान, मागील महिन्यात महारेराने डिसेंबरपर्यंत घरांचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 40% पेक्षा कमी काम झालेल्या आणि सुमारे 25 ते 500 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीच्या 261 प्रकल्पांची झाडाझडती सुरू केली. तर विकासकांना महारेराकडून कारणे दाखवा नोटिसा देखील बजावल्या.

डिसेंबर 2023 अखेर घरांचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 40% पेक्षाही कमी काम झालेल्या 261 प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिसेस बजावल्या. 25 ते 500 कोटींच्या 45,539 सदनिकांच्या या प्रकल्पांत सुमारे 26,178 सदनिकांची नोंदणी झाली. विकासकांनी महारेराकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारेच महारेराने ह्या नोटिसेस बजावलेल्या.

विकासक हे प्रकल्प येत्या 9 महिन्यात कसे पूर्ण करणार आहेत, हे साधार स्पष्ट करण्यासाठी महारेराने ह्या कारणे दाखवा नोटीसेस बजावल्या. ह्या नोटीसेस प्रकल्प नोंदणी करताना महारेराकडे दिलेल्या इमेल पत्त्यावर पाठविण्यात आल्या आहेत. या विकासकांना त्यांची बाजू स्पष्ट करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती.


हेही वाचा – …माणसांचा मेंदू काम करेनासा होतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -