घरमहाराष्ट्र...आणि गरोदर महिलेने रेल्वे स्थानकावरच दिला बाळाला जन्म

…आणि गरोदर महिलेने रेल्वे स्थानकावरच दिला बाळाला जन्म

Subscribe

मुंबई-वाराणसी विशेष ट्रेनमधून रविवारी पहाटे प्रवास करत असताना एका गरोदर महिलेेला प्रसूूतीच्या वेदना जाणवू लागल्या. कुटूंबियांनी याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांना दिल्यानंतर रेल्वेने तत्काळ इगतपुरी रेल्वे स्थानकात गाडी थांबवून रेल्वे डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली. या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला.

मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी पहाटे सोनू सिंग 9 महिन्याची गरोदर पत्नी प्रियांकासोबत ०१०९३ मुंबई-वाराणसी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान प्रियांकाला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे सोनूने याची माहिती त्वरित रेल्वे कर्मचार्‍यांना दिली. गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी इगतपुरीचे उप रेल्वे स्थानक व्यस्थापक अवधेश कुमार यांनी  इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती दिली. दरम्यान, अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्सना आणि त्यांचे पथक रूग्णाच्या वैद्यकीय सहाय्यासाठी धावून आल्या. त्यांनी महिलेला इगतपुरी येथेच उतरण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेला सुध्दा संपर्क केला. मात्र प्रियंकाला वेदना सहन होत नसल्याने रेल्वे स्थानकावर प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे मेडिकल टीमच्या सहाय्याने प्रियांकाने स्थानकावरच निरोगी बाळाला जन्म दिला. नवजात बाळ आणि प्रियांकाला प्रसूती पश्चात उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय, इगतपुरी येथे रूग्णवाहिकेतून पाठवण्यात आले.

- Advertisement -

कुटूंबियांनी मानले आभार

प्रियांकाचे पती सोनू सिंग यांनी दैनिक आपलं महानरशी बोलताना सांगितले की, प्रियांकाला होत असलेल्या त्रासामुळे मी खूप घाबरलो होतो. मात्र सहप्रवासी आणि मध्य रेल्वेकडून  तात्काळ मदत मिळाल्याने माझी पत्नी आणिध् बाळ सुखरूप आहे. मी मध्य रेल्वेचे आभार मानतोय.

- Advertisement -

आवाहनाला देतात छेद

भारतीय रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  विविध आजार असलेले नागरिक, वृध्द नागरिक, लहान मुले आणि गरोदर महिलांना रेल्वे प्रवास न करण्याचे आवाहन केले होते. मात्र या आवहानाल छेद देत, नागरिक प्रवास करताना दिसून येत आहे. हे फारच चिंताजनक चित्र आहे. भारतीय रेल्वेने यासाठी काहीतरी नियमावली बनविणे गरजेचे आहे असे मत प्रवासी संघटनाकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा –

Railway Recruitment 2020: रेल्वेत नोकरीची संधी; जाणून घ्या, अधिक माहिती…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -