घरताज्या घडामोडीयेड पांघरुण पेडगावला जायचं होतं की अभ्यास कमी होता, अजित पवारांचा अर्थसंकल्पावरून...

येड पांघरुण पेडगावला जायचं होतं की अभ्यास कमी होता, अजित पवारांचा अर्थसंकल्पावरून भाजपला टोला

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पंचसूत्री पंचतत्वात विलीन करणारी आहे. तसेच अर्थसंकल्पात सर्वाधिक योजना केंद्राच्या असल्याचे फडणवीस म्हणाले होते. यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांच्या प्रश्नांवर विधानसभा सभागृहात उत्तर देत होते. अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी ‘सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे, या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली. तर मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

- Advertisement -

महसूली तुट कमी करण्याचा प्रयत्न

राज्य अडचणीतून पुढे जात असताना राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसूली तुट कशी कमी करता येईल, नागरिकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. सरकार आणण्याचा प्रयत्न करताय ठिक आहे परंतु ठराविकांना जास्त पैसे दिले असं बोलून काय होणार आहे का? असा टोलाही अजित पवार यांनी फडणवीस यांना लगावला. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचेही २१ पक्षांचे सरकार होते याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.

चित्रपट करमुक्तीवरुन सभागृहात गोंधळ

‘द काश्मीर फाईल’ सिनेमाला करमुक्त करा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती यावर बोलताना अजित पवार यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाईल’ सिनेमाचा उल्लेख केला त्यामुळे केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच लागू होईल अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल. असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला मात्र अजित पवार यांचे बोलणे झाल्याशिवाय बोलायला दिले जाणार नाही अशी भूमिका तालिका अध्यक्षांनी घेतल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांनी ‘पळाले रे पळाले’ म्हणत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ … ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा दिल्या आहेत.

- Advertisement -

आमदारांना ५ कोटी निधी तर चालकाला २० हजार रुपये वेतन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांना ५ कोटीचा विकास निधी तर आमदारांच्या चालकाला २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला ३० हजार रुपये देणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देतानाच शेतकऱ्यांच्या बाजुने महाविकास आघाडी सरकार नाही या आरोपांचे खंडन करताना शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची आकडेवारी सभागृहात मांडली आहे.


हेही वाचा : Maharashtra Assembly Budget Session 2022 : आम्ही पुढची ५ वर्ष मोफत वीज देऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -