घरताज्या घडामोडीहत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव ठेवू, महापौर पेडणेकरांचा भाजपला खोचक...

हत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव ठेवू, महापौर पेडणेकरांचा भाजपला खोचक टोला

Subscribe

तुम्हाला ऑस्कर पुरस्कार चालतो मग प्राण्याला ऑस्कर नाव दिलेल का चालत नाही? यांच्या टीकांना कधी उत्तर देणार नाही असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठी पाट्या बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मुंबईतील राणीच्या बागेत पेंग्विन आणि वाघाच्या बछड्याचे नामकरण करण्यात आले आहे. या बछड्याचे नाव वीरा ठेवल असून पेंग्विनचे नाव ऑस्कर ठेवण्यात आले आहे. इंग्रजी नाव दिल्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून महापौर किशोरी पेडणेकरांवर आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महापौरांवर निशाणा साधला होता. यावरुन महापौर किशोरी पेडणकेरांनी पलटवार करताना पुढील वेळी हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि माकडाला चिवा नाव ठेवू असे सांगितले.

राज्यातील दुकानांच्या पाट्या यापुढे मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु राणी बागेतील नव्या जन्माला आलेल्या प्राण्यांचे नाव इंग्रजीमध्ये ठेवण्यात आले आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. यावर महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पेडणेकर म्हणाल्या आहेत की, आता माकडाचं पिल्लू येणार आहे त्यामुळे माकडाचे नाव चिवा ठेवू आणि हत्तीच्या पिल्लाला चंपा नाव ठेवू, केवळ विरोधाला विरोध करण आणि खालच्या पातळीवर टीका करणं सोडा असा सल्लाच किशोरी पेडणेकरांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.

- Advertisement -

मुंबईतील मध्यमवर्गीयांना परदेशी वातावरणाचा अनुभव येऊ द्या, यांच्या पोटात का दुखत आहे? यांना फक्त टीका करुन चमकायचे आहे. तुम्हाला ऑस्कर पुरस्कार चालतो मग प्राण्याला ऑस्कर नाव दिलेल का चालत नाही? यांच्या टीकांना कधी उत्तर देणार नाही असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

कोटेचांनी कारण नसताना आरोप करु नये

राणेच्या बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेमध्ये १०६ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यामुळे या निविदा तात्काळ थांबवण्यात याव्यात अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या आरोपांवर महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोटेचा बिल्डर आहेत आणि त्यानंतर ते आमदार झाले आहेत. निविदा प्रक्रियेवर कोणाला आक्षेप नाही परंतु निविदा काढण्यात आल्यावर त्यांना केवळ २ कंपन्यांकडून प्रतिसाद दिला होता. कोटेचा यांनी यावर अभ्यास करुन बोलावे, केवळ कारण नसताना आरोप करु नये असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा १०६ कोटींचा दरोडा, भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -