घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमुळे चीनमध्ये नागरिकांवर उपासमारीची वेळ

लॉकडाऊनमुळे चीनमध्ये नागरिकांवर उपासमारीची वेळ

Subscribe

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शियान शहरात खाण्यापिण्याच्या वस्तूच मिळत नसल्याने १३ मिलियन चीनी नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यात अनेक रुग्णांचाही समावेश आहे. यामुळे संतप्त नागरिक चीन सरकारवर कडाडून टीका करत असून अनेकांनी सोशल मीडियावर चीन सरकारविरोधात निशाणा साधला आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे घरातील अन्नपदार्थ संपल्यावर आम्ही काय करायचं? काय खायचं? असा सवाल नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकांना एका ठराविक वेळेत दुकानात जाण्यास परवानगी देण्यात आली होती. पण शियान मध्ये रुग्णसंख्या वाढल्याने सरकारने शियान शहरासह काही शहरात असा लॉकडाऊन केला की जिथे नागरिकांना घऱाबाहेर पडण्यासच मनाई करण्यात आली आहे. किराणा सामानासाठी ऑनलाईन सेवा सुरू ठेवण्यात आल्या. पण त्यावरील बुकींग फु्ल्ल झाल्याने नागरिकांना ऑनलाईन सामान देखील मिळेनासे झाले आहे. शियान शहरात दूधाचीही टंचाई झाल्याने लहान मुलांचेही हाल होत आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या सुरुवातीला २०१९ डिसेंबरमध्येही चीनने वुहान शहरात असाच लॉकडाऊन केला होता. तशीच परिस्थिती आता शियान शहरात उद्भवली आहे. चीनने कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याासठी झीरो कोवीड पॉलिसी लागू केली आहे. स्वच्छतेच्या नावाखाली सुपरमार्केट आणि मेडीकलसाठी असे काही जाचक नियम लागू केले आहेत ज्यामुळे नागरिकांना सुपरमार्केटमध्ये जाता येत नाहीये. यामुळे चीनी नागरिकांमध्ये सरकारविरोधात रोषाचे वातावरण असून सोशल मीडियावर नागरिक सरकारविरोधात ट्विट करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -