घरताज्या घडामोडीMumbai Metro News : MMRDA च्या अतिरिक्त आयुक्तपदी IAS रूबल अग्रवाल यांची...

Mumbai Metro News : MMRDA च्या अतिरिक्त आयुक्तपदी IAS रूबल अग्रवाल यांची नियुक्ती

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना पाहायला मिळत आहेत. अशातच आज (8 एप्रिल) सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या पाच आयएएस अधिकाऱ्यामध्ये रुबल प्रखर अग्रवाल यांचीही बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयएएस अधिकारी रुबल अग्रवाल यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना पाहायला मिळत आहेत. अशातच आज (8 एप्रिल) सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या सहा आयएएस अधिकाऱ्यामध्ये रुबल प्रखर अग्रवाल यांचीही बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयएएस अधिकारी रुबल अग्रवाल यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे. तसेच, अग्रवाल यांच्याकडे मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवली आहे. (Mumbai Metro News IAS Ruble Aggarwal appointed as Additional Commissioner of MMRDA)

पुणे महापालिकेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यापासून त्यांची अंमलबजावणी करण्यापर्यंत तसेच, राज्याच्या बालविकास सेवा योजनेच्या कमिशनर म्हणून काम करणाऱ्या आयएएस अधिकारी म्हणून रुबल अग्रवाल यांची ओळख आहे. रुबल अग्रवाल यांच्या आधी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे मेट्रोचा अतिरिक्त कार्यभार होता. या पदाचा कार्यभार मुखर्जी यांच्याकडून अग्रवाल यांनी सोमवारी स्वीकारला.

- Advertisement -

हेही वाचा – BMC : मराठीत फलक न लावणाऱ्या दुकानदारांना 1 मेपासून दुप्पट मालमत्ता कर

रुबल अग्रवाल या 2008 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. राज्यात गेल्या 15-16 वर्षांत त्यांनी वेगवेगळ्या खात्यांत काम केले आहे. जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून देखील काम केले. या काळात प्रचंड आक्रमकपणे प्रशासकीय यंत्रणेत बदल घडवून अग्रवाल यांनी बड्या राजकारण्यांना वठणीवर आणले होते. त्यामळे जिल्हाधिकारी म्हणून अग्रवाल यांची कारर्कीद गाजली. यासोबतच त्यांच्याकडे शिर्डी संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी देखील होती. 2019 मध्ये अग्रवाल यांची पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाली. या काळात त्यांच्याकडे महापालिकेतील आरोग्य खात्यासह महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी राहिली. यानंतर पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या ‘सीईओ’ म्हणून देखील त्यांची नेमणूक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अग्रवाल यांची या खात्यातून महिला आर्थिक विकास महामंडळात बदली झाली.

- Advertisement -

आयएएस अधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह 1999 बॅचच्या आयएएस अधिकारी अंशु सिन्हा यांची ही महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या मुंबई विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, 2007 बॅचच्या आयएएस अधिकारी दिलीप गावडे यांची दुग्धविकास आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2008 बॅचच्या आयएएस अधिकारी स्वाती म्हसे-पाटील यांची मुंबई फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी रमेश चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदाई आरोग्य योजना सोसायटी, स्टेट ॲश्युरन्स सोसायटीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय, 2019 बॅचचे आयएएस अधिकारी आणि धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा – NARENDRA MODI : दहशतवाद आणि नक्षलवाद वाढीसाठी काँग्रेस जबाबदार, पंतप्रधान मोदींचे शरसंधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -