घरठाणेडोंबिवली बेलग्रेव स्टेडियमवर हिंदू नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात

डोंबिवली बेलग्रेव स्टेडियमवर हिंदू नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात

Subscribe

कल्याण । हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बेलग्रेव स्टेडियमवर कल्याण डोंबिवलीतील तसेच रिजन्सी अनंतम मधील रासा ग्रुपच्या खेळाडूंनी भारतीय पोशाखात खेळ खेळून हिंदू नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. हिंदू संस्कृती प्रमाणे स्टेडियमवर रांगोळी देखील काढण्यात आली होती. अनेकांनी आपापल्या कलादेखील यावेळी सादर केल्या. रिजन्सी ग्रुप आणि डावखर फाउंडेशनच्या माध्यमातून एशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम डोंबिवली मध्ये साकार करण्यात आले आहे. ऑलम्पिक मध्ये कल्याण डोंबिवली येथील खेळाडू असावा या उद्देशाने हे स्टेडियम सुरू करण्यात आल्याचे डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी सांगितले.

पिकल बॉल स्टेडियम मध्ये जास्तीत जास्त सहा कोर्ट असतात पण डोंबिवलीतील बेलग्रेव या पिकल बॉल स्टेडियम मध्ये आठ कोर्ट आणि चार पॅवेलियंस आहेत. जलद गतीने वाढणारा खेळ म्हणून पिकलबॉल या खेळाकडे बघितले जाते. बॅडमिंटन आणि टेनिस या खेळाचे कॉम्बिनेशन म्हणजे पिकल बॉल. हा खेळ इनडोअर आणि आउटडोर पॅडल खेळ आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू (एकेरी) किंवा चार खेळाडू (दुहेरी) खेळू शकतात.

- Advertisement -

सिग्नल शाळेने उभारली मेडल्सची गुढी
ठाण्यातील सिग्नलवर विविध वस्तू विकणार्‍या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येणारी आगळी वेगळी शाळा म्हणून सिग्नल शाळा प्रसिद्ध आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी दहावी, बारावी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर विविध क्रिडास्पर्धांत, तंत्रकौशल्य शिक्षणात स्वमेहनतीने आजवर अनेक पारितोषिके, सन्मानचिन्हे पटकावली आहेत. त्याच मिळवलेल्या विजयाची गुढी सोमवारी सिग्नल शाळेत उभारण्यात आली. मागील 8 वर्षातील सिग्नलवरील शाळाबाह्य, शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षित करण्याचा सिग्नल शाळा नामक प्रयोगाने घातलेला घाट या विजयाच्या गुढीने अधिक सक्षम होतोय. रस्त्यावरील मुलांचे अस्तित्व या उंच विजयाच्या गुढीने अधिक ठळकपणे उंचावले आहे.
सिग्नलवरील मुलांना ‘सामर्थ्याचा’ ध्यास घेण्याची इच्छा ‘समर्थ’ ने व्यावसायिक शिक्षण, रोबोटीक, संगणक, क्रिडा, आनंददायी शिक्षण या माध्यमातून दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -