घरट्रेंडिंगवादळ ईशान्य दिशेला वळणार, सहा तासांत तीव्रता कमी होणार!

वादळ ईशान्य दिशेला वळणार, सहा तासांत तीव्रता कमी होणार!

Subscribe

पुढील सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असून त्याती तीव्रताही कमी होणार आहे.

गेले काही तास आपण निसर्ग चक्रीवादळानं धारण केलेलं रौद्ररूप अनुभवलं. राज्यात किन्नारपट्टीभागासह अनेक भागात वादळाचा फटका बसतोय. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच समुद्राला उधाण आलं आहे. हळूहळू वाऱ्याचा वेगही वाढत आहे. किनारालगतच्या लोकांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात आलं आहे. मात्र गेले तास सुरू असलेलं निसर्गाच्या रौद्ररूपाची तीव्रता पुढील सहा तासात कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

अजून वादळ पुर्णत: समुद्राच्या बाहेर आलेलं नाही. त्याचा काही भाग अजूनही समुद्रावरच आहे. पुढील तासाभरात हे वादळ जमिनीवर दाखल होईल. सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता ९०-१०० किलोमीटर प्रती तास ते ११० किलोमीटर प्रती तास इतकी आहे. पुढील सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असून त्याती तीव्रताही कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. वादळाचा प्रभाव श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात जास्त असल्याने, अलिबाग येथील एनडीआरएफच्या दोन टिम मुरुडकडे रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १३ हजार ५४१ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.


हे ही वाचा- निसर्ग चक्रीवादळ – समुद्रकिनारी यंत्रणा सज्ज!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -