घरमहाराष्ट्रधनंजय मुंडेवर बलात्काराचा आरोप करत पाच कोटी मागणाऱ्या महिलेला अटक

धनंजय मुंडेवर बलात्काराचा आरोप करत पाच कोटी मागणाऱ्या महिलेला अटक

Subscribe

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका परिचित महिलेने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत पाच कोटींची मागणी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय मुंडे यांनी धमकी येताच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने त्या महिलेला अटक केली आहे. तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचं नाव रेणू शर्मा असं आहे. तिला इंदूर येथून अटक केली. धनंजय मुंडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी ते मार्च महिन्यात संबंधित महिलेने आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फोन करुन पाच कोटीं आणि महागड्या मोबाईल फोनची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्यास समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिली होती.

या महिलेने काही दिवसांपूर्वी खोटी कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट करत बदनामी करुन धनंजय मुंडेंचं मंत्रीपद घाललण्याची धमकी दिली होती. तसं नको असेल तर पाच कोटीचे घर आणि पाच कोटींच्या कंपना द्या, अशी मागणीही तिने केली होती. आरोपी महिलेविरोधात पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -