घरमहाराष्ट्रमनसेचे नितीन नांदगावकर होणार तडीपार!

मनसेचे नितीन नांदगावकर होणार तडीपार!

Subscribe

ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नांदगावकर यांना तडीपार केलं जात असल्यामुळे मनसेकडून या कारवाईला जोरदार विरोध होतो आहे.

मंगळवारी (काल) मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना २ वर्ष तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. ड्रग्ज विकणारी टोळी, पासपोर्ट घोटाळा तसंच रिक्षा चालकांची दादागिरी नितीन नांदगावकर यांनी उघडकीस आणली होती. मात्र, हे करत असताना नांदगावकर यांनी कायदा हातात घेतला, असा ठपका लावत त्यांना तडीपार करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नांदगावकर यांना अशाप्रकारे तडीपार करण्याच्या हालचाली सुरु झाल्यामुळे, आता मनसेकडून या कारवाईला जोरदार विरोध केला जात आहे.

काय म्हणाले नांदगावकर?

दरम्यान, मुंबई पोलिसांनी बजावलेल्या या नोटिसला उत्तर देताना ‘संघर्ष अटळ आहे’ अशी प्रतिक्रिया नितीन नांदगावकर यांनी दिली आहे. ‘सर्वसामान्य माणसांना माझी भीती वाटते असा आरोप करत, मुंबई पोलीस कामाला लागले आहेत. पण माझी भीती नेमकी कुणाला वाटते? हा खरा प्रश्न आहे’, असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. नोटीसचं उत्तर देताना नितीन नांदगावकर म्हणतात की, ‘मला तडापार करुन करुन कुठे करणार? अख्खा महाराष्ट्र माझा आहे. जनतेने सांगावे की मी कुठे चुकतो आहे. काहीही झाले आणि कुठेही गेलो तरी मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार’.

- Advertisement -

संघर्ष अटळ आहे..माझी भीती नेमकी कोणाला वाटतेय..??मुबंई पोलीस मला २ वर्षासाठी तडीपार करायला निघालेत…आज मला माय-बाप जनतेने सांगावे …..सर्वसामान्य नागरिकांना माझी भीती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले..महाराष्ट्र माझा आहे कुठे कुठे मला तडीपार करणार…जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय…माझा शब्द आहे जनतेला… मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणारच…

Posted by Nitin Nandgaonkar on Tuesday, February 19, 2019


संघर्ष अटळ आहे..

माझी भीती नेमकी कोणाला वाटतेय..??
मुबंई पोलीस मला २ वर्षासाठी तडीपार करायला निघालेत…
आज मला माय-बाप जनतेने सांगावे …..

- Advertisement -

सर्वसामान्य नागरिकांना माझी भीती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले..

महाराष्ट्र माझा आहे कुठे कुठे मला तडीपार करणार…
जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय…
माझा शब्द आहे जनतेला… मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणारच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -