घरटेक-वेकसावधान! 'हे' App तुमचं बँक अकाउंट करेल रिकामं

सावधान! ‘हे’ App तुमचं बँक अकाउंट करेल रिकामं

Subscribe

सध्या AnyDesk अॅपवर हॅकर्सची सर्वाधिक नजर असल्याचं एका रिपोर्टद्वारे समोर आलं आहे.

प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेले ‘AnyDesk’ हे अॅप हे धोकादायक असल्याची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जाहीर केली आहे. ग्राहकांनी AnyDesk मोबाइल App डाउनलोड करू नये, असा इशाराच आरबीआयने दिला आहे. हे अॅप सुरु होण्यापूर्वी ग्राहकांकडून बॅंकेशी निगडीत काही माहिती तसंच काही परवानग्या मागते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, या प्रक्रियेदरम्यान तुमचं बँक अकाउंट हॅक करुन हॅकर्स त्यातील सर्व रक्कम लुटणयाचा प्रयत्न करु शकतात. सध्या AnyDesk अॅपवर हॅकर्सची सर्वाधिक नजर असल्याचं एका रिपोर्टद्वारे समोर आलं आहे. हे अॅप हॅकर्ससाठी एखाद्या रिमोट कंट्रोलप्रमाणे काम करते. त्याचा वापर अनेक डिव्हाइस एकमेकांशी जोडण्यासाठी केला जाऊ शकतो, अशीही माहिती RBI ने जारी केली आहे.

anydesk app

- Advertisement -

RBI कडून सतर्कतेचा इशारा

याविषयी आरबीआय सायबर सिक्युरिटी आणि IT एक्झामिनेशन सेलने ग्राहकांसाठी एक अलर्ट मेसेज जारी केला आहे. हे App फोनमध्ये इनस्टॉल केल्यानंतर फोनमधील अनेक गोष्टींच्या अॅक्सेसची परवानगी मागतं. ही परवानगी युजर्सकडून मिळाल्यानंतर एनी डेस्क आपल्या फोनमध्ये असलेल्या पेमेंट App ची माहिती, आयडी आणि पासवर्ड रेकॉर्ड करते. त्यानंतर युझरच्या फोनवर ९ अंकांचा अॅप कोड जनरेट केला जातो. सायबर क्राईम करणारे बँकेच्या नावावर मागतात आणि एकदा का ग्राहकांनी हा नंबर दिला की त्यांचे अकाउंट हॅक केले जाते. SkyDesk च्या माध्यमातून हॅकिंगची शक्यता असल्यामुळे हे अॅप त्वरित डिलीट करण्याचा सल्ला आरबीआयकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -