घरमहाराष्ट्रमुंबई – पुणे महामार्ग आज दोन तास बंद

मुंबई – पुणे महामार्ग आज दोन तास बंद

Subscribe

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा मोगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा मोगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज या मार्गावरी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून या महामार्गावर ओव्हरग्रेड ग्रँन्ट्री बसवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ओव्हरग्रेड ग्रँन्ट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दोन तास ही वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (एमएससीआरटी) ने केले आहे.

वाहतूकीत करण्यात आला बदल

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील ब्लॉक दरम्यान सर्व अवजड वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. अवजड वाहतूक ही खालापूर आणि कुसगाव टोलनाक्याजवळ थांबवण्यात येणार आहे. तर चारचाकी आणि इतर प्रवाशी वाहने ही कुसगाव टोलनाक्याहून जुन्या मुंबई पुणे महामार्गाद्वारे पुण्याकडे वळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रवाशांचे हाल

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे. त्याचप्रमाणे दररोज मुंबई – पुणे असा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.


हेही वाचा – मुंबई – पुणे प्रवास सुखकर; नव्या वेळापत्रकानुसार ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ धावणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -