घरमहाराष्ट्रMumbai University merit list: सेंट झेवियर्सच्या कला विभागाची कट ऑफ सहा टक्क्यांनी...

Mumbai University merit list: सेंट झेवियर्सच्या कला विभागाची कट ऑफ सहा टक्क्यांनी वाढली

Subscribe

मुंबई विद्यापीठाकडून अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी पहिली मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आली. यात सेंट झेवियर्स कॉलेजने १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीएच्या पहिल्या वर्षातील प्रवेशासाठीची मेरिट लिस्ट ९८ टक्क्यांवर बंद केली. मात्र कट ऑफमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी वाढ झाली. यात इतर बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ ९९. २ टक्के होती. मात्र गेल्यावर्षी हीच कट ऑफ ९८.२ टक्क्यापर्यंत होती.

बीएससीच्या पहिल्या वर्षातील बायोलॉजी विषयातील प्रवेशासाठी राज्यातील १२ बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ ९२ टक्क्यांपर्यंत होती. मात्र यंदा या कट ऑफमध्ये १३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर नॉन-बायोलॉजी विषयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची कट ऑफ ५ टक्क्यांनी वाढली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान शिक्षण मंडळांकडून १२ वीचे निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये ९० टक्क्यांवर गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या पंसतीचे कॉलेज मिळणे अवघड झाले आहे.


Weather Update : राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ ८ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -