घरमहाराष्ट्रMumbai University: मुंबई विद्यापीठाची पहिली UG गुणवत्ता यादी आज होईल जाहीर

Mumbai University: मुंबई विद्यापीठाची पहिली UG गुणवत्ता यादी आज होईल जाहीर

Subscribe

मुंबई विद्यापीठाअंतर्गत(Mumbai University) येणाऱ्या सर्व कॉलेज, मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. यात विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. यात एमयू, बीए, बीएएफ, बीकॉम, बीएससी, बीएफएम, बीएमएम आणि विद्यापीठाअंतर्गत इतर अभ्यासक्रमांची पहिली गुणवत्ता यादी mu.ac.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी संबंधित महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या वेबसाइटवर यादी देखील तपासू शकतात.

मुंबई विद्यापीठात अनुदानित, विना अनुदानित विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व नोंदणी बंधनकारक आहे. ही प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया ५ऑगस्टपासून सुरु झाली असून १४ ऑगस्टपर्यंत सुरु होती. यात पदवी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट तर तिसरी ३० ऑगस्ट रोजी जाहीर होईल.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयाच प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना mum.digitaluniversity.ac या वेबसाईटवर नावनोंदणी करावी लागेल. यात विद्यार्थ्यांना सेल्फ अफेडेविट भरुन कोणत्याही एका कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करणं गरजेचं असेल. तो निश्चित झाल्यानंतर मुळ कागदपत्र सादर करुन अंतिम प्रवेश दिला जातो.


 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -