घरताज्या घडामोडीवंशाच्या दिव्यासाठी महिलेचा परदेशात ८ वेळा गर्भपात, १५०० इंजेक्शन टोचली

वंशाच्या दिव्यासाठी महिलेचा परदेशात ८ वेळा गर्भपात, १५०० इंजेक्शन टोचली

Subscribe

प्री इम्पलांटेशन जेनेटिक डायगनोसीस ट्रिटमेंटमध्ये स्टेरॉईड्सचा उपयोग

वंशाचा दिवा मुलगा पाहिजे या साठी पती आणि सासरच्या मंडळींनी माझ्या इच्छेविरुद्ध ‘प्री इम्पलांटेशन जेनेटिक डायगनोसीस’ साठी परदेशात घेऊन गेले त्या ठिकाणी मला दीड हजार इंजेक्शन देण्यात आली. या ट्रीटमेंटमुळे माझे ८ वेळा अनैसर्गिक गर्भपात करण्यात आला असल्याचा आरोप एका पीडित विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, याप्रकरणी दादर पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

 

- Advertisement -

विरोधानंतरही उपचार

 

पीडित महिला उच्चशिक्षित असून तिच्या सासरची मंडळी देखील उच्चशिक्षित दादर परिसरात राहणाया आहे. पीडित महिलेला ११ वर्षाची मुलगी आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासरच्या मंडळींनी पीडित महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, तेवढ्यावर ना थांबता पीडितेच्या पोटात मुलाचा गर्भ राहण्यासाठी तिच्यावर मुंबईतील विविध प्रसिद्ध डॉक्टरकडून उपचार सुरु केले होते. या सर्व गोष्टीला या पीडित महिलेचा विरोध होता असे तिने आपल्या जबाबात म्हटले आहे.

- Advertisement -

 

शरीर काळे निळे पडले

 

पुढे पीडितेने आपल्या जबाबत असे म्हटले आहे की, ‘प्री इम्पलांटेशन जेनेटिक डायगनोसीस’ (जन्मापुर्वी लिंग तपासणीसाठी बीजचे अंमजबजावणी) या उपचारासाठी पतीने तिच्यावर बळजबरी केली व काही चाचण्या करण्यासाठी तिला परदेशात नेण्यात आले होते. परदेशात तिच्यावर जवळपास ८ वेळा गर्भ धारणेच्या आधी एम्ब्रीयोच्या लिंगाची (बीजाची) परीक्षा करुन तिच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत ,  हया उपचारासाठी तिच्यावर जवळपास दीड हजार पेक्षा अधिक हाँरमोनल व स्टीराँइड इनजेक्शन देण्यात आले असल्याचे पीडित विवाहितेने जबाबात म्हटले आहे. तसेच भरपुर ताकदीचे डोस देण्यात आल्यामुळे माझ्या संपुर्ण शरीरात  वेदना होत आहेत. तसेच शरीर हे काळे निळे पडले आहेत, या उपचारामुळे सुमारे ८ वेळा अनैसर्गिक गर्भपात तिच्या इच्छेविरोध करण्यात आला असल्याचा आरोप तिने जबाबात केला आहे. या मुळे तिला मणक्याचा त्रास होऊन उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटले आहे. दादर पोलिसांनी पीडित विवाहितेच्या तक्रारी वरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दखल केला असून याप्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांची दिली आहे.


हे ही वाचा – माध्यम क्षेत्रातील दादा प्रदीप गुहा यांचे ६० व्या वर्षी निधन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -