घरताज्या घडामोडीसावधान! रस्त्यात थुंकणे पडणार महागात; 'ही' होणार शिक्षा

सावधान! रस्त्यात थुंकणे पडणार महागात; ‘ही’ होणार शिक्षा

Subscribe

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर होणार कारवाई.

पुणे, मुंबई या शहरांमध्ये शहर स्वच्छता अभियानांतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते. मात्र, असे असून देखील नागरिकांमध्ये जागृती होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात रस्त्यावर थुंकल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला शर्ट काढून थुंकी पुसायला लावली असल्याची घटना घडली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अशा थुंकी बहाद्दरांवर कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे रस्त्यावर थुंकणारे चांगलेच धास्तावले आहेत. विशेष करुन पान, तंबाखू खाणारे लोकं मोठ्या प्रमाणात थुंकतात. अशा सर्वांवर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

सहा महिन्यांचा तुरुंगवास

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असून यासोबतच त्या व्यक्तीला सहा महिने जेल होणार असल्याचेही सरकारने सांगितले होते.

दहा हजार रुपयाचा दंड

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. नागपुरातही थुंकणाऱ्यावर एक ते दहा हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच मास्क नसेल तरीही प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, थुंकणाऱ्यांवरही आळा बसण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेतला. पुण्यात झालेल्या कारवाईमुळे नक्कीच थुंकणाऱ्यांमध्ये भीती राहील आणि त्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांमध्ये घट होईल, असे म्हटले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबादमध्ये नव्या ११४ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार २६४


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -