घरक्रीडाआज होणार वर्ल्ड कप टी-२०चा फैसला!

आज होणार वर्ल्ड कप टी-२०चा फैसला!

Subscribe

कोरोना विषाणूमुळे या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवर टांगती तलवार आहे. वर्ल्ड कपचं भवितव्य ठरवण्यासाठी आज १० जूनला एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत वर्ल्ड कपवर असलेली संकटं दुर करुन वर्ल्ड कपचं आयोजन होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआय ऑस्ट्रेलियाला २०२१ विश्वचषकाचं यजमानपद देईल, तर २०२२ विश्वचषकाचं यजमानपद बीसीसीआय स्वत: करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

यावर्षीच्या वर्ल्ड टी-२० बद्दलचं मत आयसीसीने जाहीर करावं. यावर्षीच्या स्पर्धेबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही, असं बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ म्हणाले. तथापि, भारत एकतर पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार २०२१ च्या स्पर्धेचे आयोजन करेल आणि २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाईल किंवा ते पूर्ववत होऊ शकेल, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याचा आणखी एक पैलू म्हणजे प्रसारक स्टार इंडिया, ज्याने आयपीएल आणि आयसीसी स्पर्धांमध्येही गुंतवणूक केली आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, “स्टार हा एक भागधारक देखील आहे. त्यांचं मतही महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चेंडूला चमकवण्यासाठी थुंकीला पर्याय गरजेचा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -