घरताज्या घडामोडीबेडसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकू नका, महापालिकेचा थेट कॉंग्रेस आमदाराला सल्ला

बेडसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकू नका, महापालिकेचा थेट कॉंग्रेस आमदाराला सल्ला

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने केलेल्या ट्विटवर मुंबईतील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा आक्षेप

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळण्याकरता लोकप्रतिनिधींना ट्विट, मेसेज, फोन करुन मदत नातेवाईक, रुग्ण मदत मागत असतात परंतु आता मुंबई महानगरपालिकेने ट्विट करत लोकप्रतिनिधींना व्यवस्थेत हस्तक्षेप करु नका तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांवर बेडसाठी दबाव आणू नका असे ट्विट केले आहे. त्यामुळे मुंबईतील काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकी यांनी आक्षेप घेतला आहे. कोरोना काळात लोकप्रतिनिधी मदत करत आहेत परंतु महापालिकेने केलेल्या ट्विटमुळे लोकप्रतिनिधींच्या मदतीवर प्रश्नचिन्हा निर्माण झाले आहे.

कोरोना काळात सर्व समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांना बेड मिळवण्याकरिता, ऑक्सिजन,औषध मिळवण्यासाठी मदत करत आहे. तसेच लोक बेड मिळत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींना संपर्क करतात त्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी मदत करतो. मुंबईतील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनीही कोरोना काळात अनेक नागरिकांना मदत केली आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेने ट्विट करत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करु नये असा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेने ट्वीट करत म्हटले आहे की, महानगरपालिकेने वॉर्ड रुमची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून वॉर्डमधील उपलब्ध बेड संख्या आणि कुणाला आवश्यक असल्यास तो मिळवून दिला जातो. लोकप्रतिनिधींनी या व्यवस्थे हस्तक्षेप करु नये. असा सल्ला मुंबई महानगरपालिकेने ट्विट करत दिला आहे. तसेच बेडसाठी लोकप्रतिनिधींनी कोणत्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकू नये असे देखील ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेने केलेल्या ट्विटवर मुंबईतील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी आक्षेप घेत ट्विट केले आहे की, महापालिकेचा कसला अहंकार आहे. हे सर्व करत असताना लोक मदतीसाठी आम्हाला टॅग का करतात? आपण करीत असलेल्या कार्याचे आम्ही कौतुक करतो पण सामाजिक कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी, एनजीओ, राजकारणी, सामान्य नागरिक-प्रत्येकजण एकत्र काम करत सामान्य माणसाला मदत करत आहे. आम्ही सर्व यात एकत्र आहोत त्यामुळे असा आक्षेप घेणे योग्य नाही असे आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -