घरताज्या घडामोडीNagar Panchayat Election : नगर पंचायतींच्या 336 जागांसाठी 18 जानेवारीला होणार मतदान

Nagar Panchayat Election : नगर पंचायतींच्या 336 जागांसाठी 18 जानेवारीला होणार मतदान

Subscribe

इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ९३ नगर पंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी 18 जानेवारीला  मतदान होत आहे. मतदान होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तर रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली नगर पंचायतींचा समावेश आहे. येथे  बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ९३ नगर पंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी 18 जानेवारीला  मतदान होत आहे. मतदान होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तर रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली नगर पंचायतींचा समावेश आहे. येथे बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 106 नगर पंचायतींसाठी निवडणूक जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा ओबीसी आरक्षणचा अध्यादेश रद्दबातल ठरवल्यानंतर नगर पंचायतीमधील ओबीसी जागा खुल्या करण्यात आल्या. या खुल्या झालेल्या जागांसाठी मतदान होत आहे.

एकूण 106 नगरपंचातींपैकी पालघर जिल्ह्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, यवतमाळ जिल्ह्यातील झरी- जाणणी, गडचिरोलीतील मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील चार आणि आणि कळवणमधील दोन जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी मतदान होईल.

- Advertisement -

दरम्यान, भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10 तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठी मतदान होत आहे. विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी सुद्धा मतदान होईल. तर सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील  मतदान घेण्यात येईल.


हेही वाचा – पारशी पद्धतीने कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुप्रीम कोर्टाची बंदी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -