घरमहाराष्ट्रNana Patole : ...अखेर नाना पटोले संजय राऊतांबाबत बोललेच, म्हणाले - अशी...

Nana Patole : …अखेर नाना पटोले संजय राऊतांबाबत बोललेच, म्हणाले – अशी वक्तव्ये…

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले काँग्रेसचे नेते राऊतांना उत्तर देऊ लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राऊतांना सल्ला देत शांत राहण्यास सांगितले आहे.

मुंबई : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढा वाढत चालला आहे. पण त्याचसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे काँग्रेसविरोधात खोचक टीका करत असल्याने मविआत वादाची ठिणगी पडल्याचेही पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले काँग्रेसचे नेते राऊतांना उत्तर देऊ लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राऊतांना सल्ला देत शांत राहण्यास सांगितले आहे. एका मोठ्या नेत्याने लहान कार्यकर्त्यांसारखे वक्तव्य करू नये, असा सल्लाच आता नाना पटोलेंकडून देण्यात आला आहे. (Nana Patole advises Sanjay Raut to keep calm)

हेही वाचा… Lok Sabha : घोलपांचा नार्वेकरांमुळे शिवसेनेला जय महाराष्‍ट्र, तरीही गोडसे तिकिटासाठी नार्वेकरांच्‍या संपर्कात

- Advertisement -

सांगली लोकसभेतून शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला काँग्रेसचे सांगलीतील आमदार विश्वजीत कदम यांनी कडाडून विरोध केला आहे. इतकेच काय तर त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना देखील या लोकसभेवर काँग्रेसचा दावा सांगा, अन्यथा…, असा इशारा दिला आहे. ज्यामुळे संजय राऊतांनी सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू, असे काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडेतोडे प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी आपली नौटंकी बंद करावी. ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये, दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू. त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखं बोलू नये, ते मोठे नेते आहेत, त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्ये करू नये, असा सल्लाच नाना पटोले यांच्याकडून देण्यात आला आहे. पण त्यांच्या या सल्ल्याला राऊतांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. नाना पटोले बोलले तर ठीक आहेत, असे राऊतांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha : निवडणुकीत आयात उमेदवारांचा बोलबाला; ठाकरेंचे चार तर शरद पवारांचे तीन उमेदवार रिंगणात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -